बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

विचार - मुकेश गुरव, तलोदा

साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका
हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका
जीवनात नुसत्या दोन चाकावर गाडी धावत नसते
साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळत नसते
तोडताना एक घाव पुरतो
जोडताना किती भाव मोजावा लागतो
विचारांचा वेगळा हा पगडा पण आचरणाचा सगळा झगडा असतो.

     ____________-________________
सुख-दुखाचे धागे विणुन
आयुष्य परिपूर्ण बनते
पण कुठला धागा आपण कुठे,
कसा आणि किती वापरतो
त्यावर आयुष्याचे यश ठरते...

      -----------------

सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…

कधी कधी त्यात रंग
भरायचे असतात पण
स्वप्न पुर्ण झालं नाही
तर दुखी व्हायच नसतं..

रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं फक्त
लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत..

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा