अभिनंदन
       भामरे आण्णा
मी जानेवारी १९७०ला नागपूरचा दौरा केला.
पहिली भेट भंडारा रोड रेल्वे स्टेशन वरिल काळे हवालदारांशी झाली. 
त्या ऊभयतांनी केलेले स्वागत व पाहुणचार ईतका प्रेमाने ओतपोत भरलेला होता की अजून मला त्याची चव जाणवते.
त्याच रेल्वे स्टेशन वरिल गुरव पान ठेल्याची चव जीभेवर आहे.
आलो नागपूरला.आयोचित मंदिराच्या परिसरातील एम् एम् शिवणकरांचे मेन रोडवरील घर.
त्या घरातिल विहीरीच्या पाण्यावर मनसोक्त स्नान !
अहाहा!!
दोन बादल्या तिन बादल्या ;अहं मनसोक्त मुबलक पाणी.
नास्त्यानंतर शिवणकर साहेबांबरोबर गुरव समाजाच्या बांधवांच्या घरांना भेट
मसाले वाले तेव्हा रोडवर बसायचे.
ते कट्टर आर् एस् एस् चे.
धुळ्याचे नाव ऐकल्याबरोबर प्रश्न फेकला.
फुलवांरीना ओळखता?
जयराम फुलवारी आर् एस् एस् चे विचारणे गैर नाही .
मी मना मध्ये विचार करत होतो. मी स्वताची ओळख देणारा.आता काय भावाची ओळख देवू.
धुळ्याचे सांगता मग त्यांना नाही ओळखत ?,नागपुरी प्रश्न
तस नाही ; मी त्यांचा लहान भाऊ!
मग काय--फुलवारी वाघमारे अन सकाळ पेपरचे रत्नींगिरीचे दत्ता गुरव  
तिघे एकत्र आल्यावर काय गुरवांच्या प्रगतीच्या विषयावर चर्चा होते त्याचे वीसेक मिनीटे गिह्राईक करतांनाच चर्चा.फुलवारींचा भाऊ म्हणजे त्याचांच भाऊ.
हे बघा शिवणकर यांना आता पंधरा दिवस नागपुरातच राहू द्या.काय !मी म्हटले दादा माफ करा. मी मात्र आज जाणार आहे.
कॉलेजला दांडी मारून मी समाज ओळखिला निघालोय.
अभ्यासावरही लक्ष राहू द्या!कारण त्याच्यावर पुढचे भवितव्य आहे.त्यांचा आशिर्वाद घेवून शिवणकरांचे जावई शेटे यांचे कडे पोहचलो.
कोर्टात हजेरी देवून ते माझ्या साठी घरी आले होते .व्यवसायाने वकिल 
पण त्यांनी सुद्धा प्रेमाणे नागपूरलाच या !चागली नौकरी देवू अन काय घाई निदान सर्व नागपूर तर पहा! प्रेमाचा आग्रह .
अन तेच नागपूरकर जेव्हा त्यांच्या कार्यक्रमाला देवेंन्द्र फडणविस सिएम् यांना कार्यक्रमाच्या ऊद्घाटनाला सहज गत्या पाचारण करतात
त्याचें कौतुक करावे ते थोडेच.
खरोखर नागपूरकर कौतुकास् पात्र आहेत .त्यांनी असेच कार्यक्रम घ्यावेत अशी सदिच्छा!
त्यांचे  अखिल भारतिय गुरव समाज हितवर्धक संस्थे मार्फत अभिनंदन!!!      
  विश्वासराव भामरे (आण्णा)
        अध्यक्ष
अ भा गुरव समाज हितवर्धक संस्था
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा