शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

चल प्रिये आपण प्रेम करायच...!!! -राजवैभव संकलन प्रा. नितीन चव्हाण

एक प्रेमकविता...
नक्की वाचा...

चल प्रिये आपण प्रेम करायच...!!!
-राजवैभव

चल प्रिये आपण प्रेम करायच...!!!
कधी तु सई मी शिवबा बनायच,
अन्यायाविरोध दोघानी चार हात करायच.
स्वाभिमानाची बिज साऱ्यांच्यात पेरायच..
चल प्रिये आपण प्रेम करायच...!!!

चल प्रिये आपण प्रेम करायच..
कधी मी ज्योती,तु साऊ बनायच
अज्ञानाना शिक्षित करायच,क्रांतिचि मूळाक्षरे गिरउन घ्यायच..
चल प्रिये आपण प्रेम करायच...

चल प्रिये आपण प्रेम करायच...
कधी तु रमा अन् मी भिमा बनायच,
गुलामगिरिच बंदपाश तोडून टाकायच..
समतेच जिन जगायला शिकवायच
चल प्रिये आपण प्रेम करायच...

चल प्रिये आपण प्रेम करायच...!!!

कधी तु लक्ष्मी, कधी मी भाऊराव बनायच,
भुकेला अन्न, अडान्याना शिक्षण,आणि रिकाम्या हाताला काम द्यायच
चल प्रिये आपण प्रेम करायच...

चल प्रिये आपण प्रेम करायच...
सत्य अहिंसा शांती समता बंधुता या तत्वाना कधी नाही तोडायच
पंचशीलेनच सार आयुष्य व्यथित करायच
चल प्रिये आपण प्रेम करायच...

चल प्रिये आपण प्रेम करायच...
प्रबुद्ध भारताच बाबांच स्वप्न आपणच पूर्ण करायच
अशोकचक्रच्या तिरंग्याखाली साऱ्याना एकत्र करायच
चल प्रिये आपण प्रेम करायच...!!!
चल प्रिये आपण प्रेम करायच...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा