रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

विचार - श्री मुकेश अहिरे, पुणे

टिपावं तर अचूक टिपावं,
नेम तर सारेच धरतात..

शिकावं तर माफ करायला,
राग तर सगळेच करतात..!

खळगी भरावी तर उपाशी पोटाची,
पोट भरुन तर सारेच जेवतात..

प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष,
सुखाचे घोट तर सारेच घेतात..!

जगावं तर इतरांसाठी,
स्वतःसाठी तर सगळेच जगतात.
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा