मित्रांनो.....
प्रत्येक विद्यीर्थिनीच्या आईला नेहमी वाटतं मुलीच्या शिक्षकांना भेटावं,
मुलीच्या प्रगतीसाठी कौटुंबिक जिवन मांडावं. पण सर्वांना ते शक्य होत नाही म्हणुन कवितेतुन अडाणी आईने मांडलेली व्यथा ....
अडाणी आईचं शहाणपन...
*******************
सर,
माह्या लेकीचं
तुमीच बाप न् माय,
पोटामागं फिरते मी
मला बाकी कळत नाय..
लेक माही नक्षत्रावाणी
बाहेर धाडाया मन व्हत नाय,
सर, तुमच्या जादा तासाला बी
पोरगी निर्धास्त धावत जाय,
तुमच्यागत ईस्वासाचं
जगात तिला कुणीबी नाय,
पोटामागं फिरते मी
मला बाकी कळत नाय......
सर, माही पोर ग्याटम्याट बोलती
कंचबी गणित झटक्यात सोडती,
दु:ख वाचुन बुकातलं
धाय मोकलून रडती
हात तिचं पिवळं होण्याआगुदर
व्हतील का तिचं भक्कम पाय,
पोटामागं फिरते मी
मला बाकी कळत नाय.........
वाण्या बामनाच्या पोरींगत
ती नंबरात आली पायजे,
रक्ताचं पाणी करीन मी सर
पण,पोर सायबीन झाली पायजे
माह्यागत फरफट मी
पोरीची होऊ देणार नाय,
पोटामागं फिरते मी
मला बाकी कळत नाय...
तुमचं नाव रोज
पोर माही घेत जाय,
म्हणी, सर माह्यासाठी जणू
देवच हाय.
माणसातली भूतं रोखाया
माह्यात तेवढा दम नाय,
पोटामागं फिरते मी
बाकी मला कळत नाय..
तुमी तुमची पोरगी
माह्या पोरीत पाहाता,
बापागत भल्याबु-याचं
तिला रोज सांगता.
या आडाणी आईचा
मनापासुन तुम्हाला दुवा हाय,
पोटामागं फिरते मी
मला बाकी कळत नायं
सर , माह्या लेकीचं
तुमीच बाप न् माय......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा