लसूण आणि तारूण्याचा काय संबंध असं तुम्हाला वाटू शकतं, पण लसूण आणि आरोग्याचा देखील मोठा संबंध आहे. लसूण प्रभावी जंतुनाशक आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण लसणात अॅलिसिन नावाचं रसायन असते, लसूण अॅन्टिबायोटिकचेही काम करतो.
लसणीमुळे कोलेस्टेरॉल कमी होतो, आणि तुम्ही रक्ताच्या गुठड्यांपासून दूर राहतात, यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात टळतो. लसूण हा खरा तर हृदयरोग प्रतिबंधक आहे.
लसूण रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉलचा थर काढून टाकतो, रक्त पातळ करतो, गुठड्या काढून काढतो, लसणात सल्फरचे संयुग असते, हे संयुग कॅन्सरचा प्रभावी सामना करत असतं. एवढंच नाही शरीरातील पेशींना कॅन्सरशी लढण्यास चालना मिळते, ती लसणातील घटकांमुळे, तसेच आपोआप रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होत असते.
लसणीमुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. यामुळेच शरीराला नवतारूण्य प्राप्त होते, सहनशक्ती वाढण्यासही मदत होते. रोज जेवतांना एक लसणीची पाकळी खाल्ली तर त्यांचा उत्तम परिणाम शरीरावर होतो, पण रोज दोन पाकळ्या खाणेही वाईट नाही.
मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५
लसूण आणि तारूण्य - श्री.कल्पेश शिरसाठ,
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा