मला वाटते मना विरूद्ध जर काही झाले तर मनुष्याचा संताप अनावर होतो.
पण एखाद्याने जाणून बुजुन विष शिंपडावे अन ते शिपंडल्याचा आरोप जर कुणी केला.तर संताप करायचा .
अन म्हणायचे की मी जे केले त्याचा विपर्यास केला .तुम्हाला त्याचे अम्रृत करता आले नाही तर मी काय करणार.
आपणा सर्वांना कल्पना आहे .जे वास्तवात दिसत तस नसत.
लोकसभेला मोदीचे नेतृत्व स्विकारले तळा गाळापासून हिंदुत्व वादी कामाला लागले.
कॉग्रेसचे मिळमिळीत नेतृत्व व कुणाच्या तरी आद्नेच्या बोजाने वाकलेल्या नेतृत्वाला कंटाळलेल्या जनतेने आक्रमक मोदी स्विकारले.
भरघोष मताधिक्य मिळाले.
मोदीची हवा जगात वावटळासारखी पसरली.
मग काय?
ह्याच हवेने गॉड फॉदरांचे डोके गरगरायला लागले.
मग व्यसन घालण़्याचे शडयंत्र सुरू झाले .
वास्तवीक मोदी त्याच पठडीत जडण घडण होवून तावून सुखावून बाहेर पडलेले सर्व सामान्य नेते .
त़्यांना हिदुत्व वादी पुढारी ऐन वेळेला का़य चाली खेळतात याचा नक्कीच अभ्यास असेल.
तरी सुद्धा जनतेला दिलेलेे अभिवचन व भारतीयांचे कल्याण हे ऊद्दिष्ट्य मनी ठेवून दिल्लीत मोदी निवडणूकांना सामोरे गेले.
सत्ता पुन्हा मिळवायला काय प्रयास पडतात याची जाणीव असलेमुळे वरिष्ट सर्वच कामी येतिल हा हिशोब ठेवूनच मुख्यंमत्र्याचे ऊमेदवार म्हणून शिस्तप्रिय किरण बेदीची निवड केली.प्रचार तर खूपच रंगला.पण आतून कशी खेळी करायची यात चतुर असणाय्रा ब्राम्हणवादी विचार सरणी बाळगणाय्रा आर् एस् एस् वाल्यांनी हातात येणारी दिल्ली सहज सोडून दिली.
व
मोदी अन शहा यांना जाणीव करून दिली की ; तुमचा करिष्मा संपला.
तिचीच पुनरावृत्ती बिहार मध्ये झाली.
सभावरून कदाचित मोदी व शहा यशस्वी होण्याची शक्यता पहाता जे सर्वस्वी एक नबंरचे हिंदुत्व वादी पद आहे त्या पदावरील व्यक्तिनेच आरक्षण समानतेचे पिल्लू सोडले.
बघा अगोदर च तिनपाठ नेत्यांनी वाचाळ पणा सुरू केला.
अन नंतर भागवतांनी सोडलेले समानतेचे पिल्लू .
टिकाकार बुद्धिजीवी आणी मागास वर्गिय सर्वांनाच आयते कोलीत मिळवून दिले.
अन जे प्रगती साठी मोदी कडे आस लावून बसलेले राज्य होते .ते पुन्हा प्रगती पासून मागे ढकलले गेले.
कदाचीत वाचाळवीरांना अद्दल घडावी म्हणून च मोदिंनी बिहारसाठी जाहिर केलेले पँकेज मंजूर केले जातील असे अभिनंदन करतांना नितीशला अश्वासन दिले.
भागवंताकडे पराभवाची सुई वळता बरोबरच त्यांचा संताप अनावर झाला.
त़्यांनी संतापण्या पेक्षा याच्यापुढे असा ऐनवेळी कोलदांडा घालून तळापासून वरपर्यंत जी कार्यकर्त्यांची फळी काम करते तिला तोंड घशी पाडण्याचे थांबवावे
स्वयंसेवकांच्या बांधिलकीचा अंत पाहू नये.
अन्यथा दिवसेंदिवस धार्मिकता कमीच होत असले मुळे व जो ब्राम्हण्यवादी पणा लादण्याचा प्रयास होत असेल तर तो दिवस दुर नसणार की स्वयंसेवक तर निर्माण होणार नाहीतच पण आर् एस एसचे अस्त्तित्व संपलेले दिसेल.
आता यु पी जवळ येतेय.
मोदींचा जगातला प्रभाव कमी करण्यात तुमचा कोलदांडा यशस्वी झालाच आहे. पण या नादात एका भारताच्या भवितव्य घडवणाय्रा नेत्याची मानसिकता कमी केल्याचा व भारताला पुन्हा प्रगती पासून दूर ठेवण्याचा ठपका फक्त भागवंता वर येईल. व ईतिहास सुद्धा त्याची नोंद घेतल्या शिवाय रहाणार नाही.
तसेच आर् एस एसने एक लक्षात ठेवले पाहीजे की मागास वर्गिय पंच्याऐशी टक्के आहेत.
आम्ही पंच्याऐंशी ही भूमिका जर रूजली ना ?
तर---
मला वाटते आपल्या सारख्या विचारवंताना कधिच डोके वर काढता येणार नाही
शेवटी लोकशाहीचाच विजय जेा पर्यत आबेंडकर शाहू फुले मत वादी आहेत तो पर्यंत होत रहाणार आहे.
मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५
कोलदांडा - श्री. विश्वासराव भामरे ( आण्णा ), धुळे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा