Friends enjoy these lines-
या वयात सुद्धा .......
कुणालाही हरवावं,
सहज पळता पळता
कुणीही थक्क व्हावं,
पाहून आपली चपळता
आणि कुणी सहज म्हणावं,
या वयात सुद्धा?
जगण्यातलं ताजेपण,
सहज दिसावं चेहऱ्यावर
कुणीही फिदा व्हावं,
सहज आपल्या पेहरवावर
आणि कुणी सहज म्हणावं,
या वयात सुद्धा?
अहो तीच ती उमेद,
कृतीतून घडत रहावी
दिवसांगणिक जगण्यावर,
प्रीत हि जडत रहावी
आणि कुणी सहज म्हणावं,
या वयात सुद्धा?
शरीराच्या थाटाला,
नको कुठे गालबोट
टी शर्ट मध्ये मिरवावं, नियंत्रणातलं पोट
आणि कुणी सहज म्हणावं,
या वयात सुद्धा?
तरुण हृदयानं,
प्रेमात पडत राहावं अनेकदा
साऱ्यांनाच वाटून जावं,
घोडा अजूनही आहे उमदा
आणि कुणी सहज म्हणावं,
या वयात सुद्धा?
सुवर्ण असो व अमृतमहोत्सव,
वयाचा कुठलाही असावा हुद्दा
आपण देताना ठेवून द्यावा,
पंचविशीतलाच गुद्दा
आणि कुणी सहज म्हणावं,
या वयात सुद्धा?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा