सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

धुळे महानगर गुरव समाज नवयुवक मंडळाचा 40 वा वर्धापन दिन साजरा

      धुळे महानगर गुरव समाज नवयुवक मंडळाचा आज  40 वा वर्धापन दिन या निम्मितधुळे  महानगर गुरव समाज नवयुवक मंडळाच्या वतीने कुष्ट आश्रम, साक्री रोड, धुळे येथे साजरा करण्यात आला.
 आज ४०वा वर्धापन दिन साजरा करतांना समाजाचे दैवत शंभू महादेवाची पुजा करण्यात येवून नवनिर्माण समाजसेवक संघाच्या कुष्ट आश्रम, साक्री रोड, धुळे येथे    व वृद्धाश्रमात सफरचंद केळी बिस्कीट पुड़्यांचे वाटप करण्यात आले. 
धुळे महानगर गुरव समाज नवयुवक मंडळ, या मंडळाची स्थापना सन 16 नोव्हें 1975 साली झाली असून माहिती नुसार महाराष्टात पहिलेच नवयुवक मंडळ स्थापन झालेले असावे.
काल धुळे महानगर गुरव समाज नवयुवक वर्धापन दिनानिमीत्त कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे कामी सभा घेण्यात आली होती. या सभेत कुष्टपेशंट व वृद्धाश्रमात फलाहार वाटप करणे व येत्या २२ तारखेला रक्तदान शिबीराचे आयोजन करणेचे ठरविण्यात आले. त्यानंतर अ.भा.गुरव समाज हितवर्धक संस्थेंचे अध्यक्ष श्री. विश्वासराव भामरे ( आण्णा ) यांनी हितवर्धक संस्थेची व्याप्ती व संकल्पना विषयी सविस्तर माहीती दिली. संस्थेस जी मदत लागेल ती मदत करण्याचे सर्वच कार्यकर्त्यांनी आश्वासन दिले. 

या वेळी अ.भा.गुरव समाज हितवर्धक संस्थेंचे अध्यक्ष श्री. विश्वासराव भामरे ( आण्णा ), एकविरा देवी संस्थानचे चिफ ट्रस्टी श्री. सोमनाथ गुरव. धुळे महानगर नवयुवक मंडळाचे अघ्यक्ष श्री. संजयजी गुरव, सेक्रेटरी श्री. भूषण गुरव, श्री. संजय रामक्रुष्ण गूरव, श्री. हेमंत मधुकर गुरव, श्री. भरत शामराव गुरव, श्री. शरद दगडू श्री.एकनाथ दगडू गूरव, श्री. जिवन बाबुराव गूरव, श्री. धनंजय धोंडूपंत गुरव,  श्री. महेश गुरव श्री. नंदलाल वामन गुरव, श्री. सुनिल बबन गुरव, श्री. परेश गुरव, श्री. निलेश रामचंद्र गुरव, श्री. राकेश गुरव, श्री. गिरीष निंबा गुरव, श्री. जे.डि. भामरे, श्री. नंदु कमलाकर गूरव,  श्री. नरहरी आप्पा गुरव, व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या मंडळासाठी कार्य करणा-या माजी व आजी पदाधिका-यांचे आणि या मंडळातील कार्यकर्तांचे आधारवड परीवारा तर्फे खुप खुप अभिनंदन !!!

पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा........!!!

 .    . .  . .  . .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा