मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

राज्यसरकारच्या प्रथम वर्षपुर्तीबद्दल भाजपा वेल्हे आयोजीत आनंद सोहळा

राज्यसरकारच्या प्रथम वर्षपुर्तीबद्दल भाजपा वेल्हे आयोजीत आनंदसोहळ्याचा एक भाग फुल पिच टेनिस टुर्नामेंटचा पारीतोषिक वितरण समरंभ विंझर येथे प्रचंड जल्लोषात संपन्न झाला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये भोर, वेल्हे, मुळशितील एकूण ४६ संघानी आपले सामने खेळले रविवारी अंतीम फेरीचा सामना झाल्यावर पारीतोषिक वितरण व नागरीकांना मिठाई वाटप करून आनंद सोहळ्याची सांगता झाली.

पारीतोषीक वितरण कार्यक्रम मा. आमदार शरदभाऊ ढमाले, मनपा गटनेते मा. अशोकआण्णा येनपुरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ सुर्वे, जिल्हा उत्पादन शुल्क समिती सदस्या सौ. शोभाताई पासलकर,  मा. भाऊसाहेब पडवळ, पै. बाबाशेठ चोरघे, पै. लालाशेठ रेणुसे, Adv. अनिलजी कदम, प्रदेश सदस्य मा. दादासाहेब धोंडे,  माजी नगरसेवक तानाजीराव पानसरे, ह.भ.प. गणेश महाराज भगत इ.  मान्यवरांच्या हस्ते आणी   उपस्थीती मध्ये संपन्न झाला.
यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, सोसायट्यांचे चेअरमन,  गावांमधील विविध प्रतिष्ठनचे अध्यक्ष इत्यादी मान्यवर  आणी भाजपा आजी माजी पदाधीकारी व तालुक्यातील बंधु भगीनी आणी मातांनी उपस्थीत राहून खेळाडुंच्या कौतक सोहळ्याची शोभा वृद्धिंगत केली.  
       कार्यक्रमाचे संयोजक                                                                                          Adv. आण्णासाहेब शिंदे (संचालक कृ. उ. बाजार समिती पुणे) आणी मित्र परीवार,  इंजी. सुनिल जागडे आणी मित्रपरीवार, श्री. भरतशेठ सोळंकी मित्र परीवार.......

कार्यक्रमाची क्षणचित्रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा