रमतो तिथेच माते जेथे तुझी निशाणी
जगणे तुझ्याविणा हे झाले उदासवाणी !
हरपून सूर गेला सोडून एकट्याला
ऐकू अता कुणाच्या तोंडून गोड गाणी !
मांडू कुणापुढे मी हे दुःख अंतरीचे
गेली कुठे रुसूनी तू कोणत्या ठिकाणी !
परतून ये पुन्हा तू ऐकून हाक माझी
ना थांबले अजूनी डोळ्यातलेच पाणी !
गायीस का कळेना आकांत वासराचा
झाली अबोल आता रात्रीस रातराणी !
स्वप्नात भेट ना तू येऊन "माधवाला"
गाईन दोन कविता काही नवी विराणी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा