रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

नाना प्रकारची माणसे...प्रा. नितिन चव्हाण

��
जीवनाच्या वाटेवर साथ देतात...
मात करतात...,
हात देतात...,
घात करतात...,
तीही असतात...माणस!

��
संधी देतात...,
संधी साधतात...,
आदर करतात...,
भाव खातात
तीही असतात...माणस!

��
वेड लावतात...,
वेडही करतात,
घास भरवतात...,
घास हिरावतात...
तीही असतात...माणस!

��
पाठीशी असतात...,
पाठ फिरवतात...,
वाट दाखवतात...,
वाट लावतात
तीही असतात...माणस !

��
शब्द पाळतात...,
शब्द फिरवतात...,
गळ्यात पडतात...,
गळा कापतात...,
तीही असतात...माणस !

��
काडिनं देतात...,
गाडीनं काढतात...,
मातीत घालतात...,
मातीलाही जातात...,
तीही असतात...माणस...!

��
दूर राहतात...,
तरी जवळचीच वाटतात...
जवळ राहून देखील परक्यासारखी वागतात...
तीही असतात ...माणस...!

नाना प्रकारची आशी नाना माणसं...,
ओळखायचीत कशी ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा