गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

तुरीची दाय - श्री.कल्पेश शिरसाठ

दिवाईच्या दिवशी आता
वरणभात नाय
दोनशे रुपये झाली
बाबू तुरीची दाय..!

अच्छे दिन च्या नांदात
सारे लंबे झाले
जुनेच दिवस माये
वापस द्या मले
पोई संग तिखट खाऊ
म्हणे माई माय
दोनशे रुपये झाली
बाबू तुरीची दाय...!

गरीबाच्या ताटातुन
काढुन घेतलं वरण
आम्ही त वाट पायतो
कई येते मरण
गरीबाले जगायचा
अधिकार नाय
दोनशे रुपये झाली
बाबू तुरीची दाय...!

गंज ठेवला चुलीवर
पाणी केलं गरम
पोट्ट्याईले म्हटलं आता
यालेच म्हणा वरण
पिवळं दिश्या साटी
हयद टाकते माई माय
दोनशे रुपये झाली
बाबू तुरीची दाय...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा