गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

विचार धन - श्री कल्पेश शिरसाठ

'आनंद' हा एक 'भास' आहे,
ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
'दु:ख' हा एक 'अनुभव' आहे ,जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच 'जिंकतो',
ज्याचा 'स्वत:वर पूर्ण विश्वास' आहे.
-----------------------------

आपली स्तुती आपण
स्वता:च करावी,

कारण तुमची बदनामी
करायला बाहेरच्या जगात
भरपुर रिकाम टेकडे बसले आहेत..

स्वच्छ चरित्र आणि धाडसी
कर्तृत्व कुणा कडूनच उसने
मिळत नाही ते फक्त स्वता:लाच
निर्माण करावे लागते..
-------------------------

जेव्हा मनुष्याची योग्यता व
हेतुचा प्रामाणिक पणा सिध्द होतो..

तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा
सन्मान करू लागतात....!

स्वार्थाची ढाल आणि दुष्कृत्यांची
तलवार हाती घेऊन लढणारा वीर
स्वतःच्या मरणाला कारणी भूत
होतो..

जीवन म्हणजे समर भूमी इथे
लहान मोठ्यांना जखमा होणारच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा