बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५

भारतीय संस्कृतीत दिवाळीचे महत्व - भूषण गुरव, - पिम्पलनेर

भारतीय संस्कृतीत दिवाळीचे महत्व अत्यंत मोठे.
याची तुलना इतर कोणत्याच सणाशी होत नाही.
मात्र इतर सण देखील त्यांच्या परिने महत्व सांगतात, पण दिवाळीचे महत्व थोडे जास्तच.
हा एकच सण देशाची केवढी मोठी अर्थव्यवस्था संभाळतो. सर्व स्तरावरील व प्रत्येक प्रकारच्या बाजारपेठा उभारी घेतात.
चलन फिरते राहून अर्थव्यवस्थेला भक्कमता येते ते फक्त भारतीय संस्कृती मधील दिवाळीच्या अनन्यसाधारण महत्वामुळेच.
समाजातील प्रत्येक घटकांना, मालका पासून ते कामगारापर्यँत, उद्योजका पासून ते ग्राहकांच्या पर्यँत याचबरोबर सेवा क्षेत्रातील घटक, स्थानीक स्वराज्य संस्था, महसूल खाते तसेच ग्रामीण भागातील पारंपारीक उद्योग करणारे उद्योजक, अल्प भांडवलधारक, लघू कूटीर उद्योग, फेरीवाले, स्टॉलवाले यांचे व्यवसाय अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतकरी यांना रोजगार मिळतो.
उदा. लक्ष्मीपुजना साठी जी "केरसुनी" (झाडू नव्हे) याची विक्री एका त्या संबधीत विक्रेत्याला विचारली तर त्यांने सांगितली की साधारण पाच ते सहा हजार केरसुन्या विकतो, मित्रांनो विचार करा कि हा एकटा एवढा विकतो तर राज्यपातळीवर पुजनासाठी किती केरसुन्या विकल्या जातात. मुळात केरसुनी निर्मीती चा व्यवसाय हा कुटीरोद्योगापेक्षा लहान पण दिवाळीच्या बाजारपेठांमध्ये अत्यंत महत्वाचा घटक.
पण अंधश्रध्दा निर्मूलनवाले, डावे, पुरोगामी, अतिसूशिक्षीत, बामसेपी, मुलनिवासी, विवीध जातीय सेवा संघ, ब्रिगेडी व इतर धर्मिय या हरामखोर करंठ्यांनी व त्यांच्या नादिलागलेल्या अर्धवट अक्कलशून्यांनी या देशाच्या महान हिन्दू संस्कृतीची माती करण्याचा जो विडा उचललाय. एक विचार करा "जर दिवाळी हा सण साजरा करणे बंदच झाले तर" आश्विन पोर्णिमे (कोजागिरी) नंतर जे दिवाळीची उत्सुकता लागते, एक प्रसन्न वातावरण तयार होते ते सगळे नष्ठ होइल. याच दरम्यान होणारी आर्थिक उलाढाल बंद होइल. अन महत्वाचे म्हणजे समाजातील आर्थिक बाजून मागास असलेले त्यांचा रोजगाराचा मार्ग खूंटेल. हा विचार करुन आपल्या मार्गचूकलेल्या व भरकटून यावरच्या मुर्खाँच्या नादि लागलेल्या आपल्याच बांधवाना जागे करा.
आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण आपआपल्या परिने, क्षमतेने व कुवतीने आनंदाने साजरा करा...
जाताजाता एक सांगतो दिवाळीचे लागणारे सर्व साहित्य हे मॉल मधून, परकिय कंपन्यांचे, चायना मेडचे खरेदि न करता आपल्याच बांधवानी तयार केलेले स्वदेशी बनावटीच्या वस्तू खरेदि करा. दिवाळी सणाचे महत्व जाणून, शास्र परंपरेन दिवाळी साजरी करा...
माझ्या कडून तुम्हा सर्वाना दिवाळीच्या दिपमयतेजा सारख्या शुभेच्छा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा