शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

देवाला पण मानलं पाहिजे

देवाला पण मानलं पाहिजे.
तो माणसांच्या जोड्या पण विलक्षण बनवतो.

एकसुरी आयुष्य खूप कंटाळवाण होईल हे त्याला माहित असतं म्हणून तो
मित्रांच्या , प्रेमाच्या
अगदी
नवरा बायकोच्याही जोड्या बनवताना
दोन अशा व्यक्तीमत्वांना एकत्रित आणतो की जे एकमेकांशी छान जुळवून घेतील.

अबोल व्यक्तीला बोलकी व्यक्ती देतो ,
गंभीर व्यक्तीला आनंदी व्यक्ती देतो ,
भांडखोर व्यक्तीला शांत व्यक्ती देतो
आणि खडूस लोकांना थोडीशी मोकळी आणि जास्त समजूतदार व्यक्ती मिळते,
ज्या योगे त्यांचही कुठे अडणार नाही...

खर तर
दोन व्यक्तीमध्ये फरक हा असणारच.

परंतु हा जो फरक आहे तो ओळखून तुम्ही कसे निभावता हे जास्त महत्वाचं असतं.

कधी कधी आपण हतबल होतो...

कारण समोरच्या व्यक्तीला कसं सांभाळून घ्यायचं हे आपल्याला कळत नाही..

पण कोण चुकतं त्यापेक्षा काय चुकतं
हे एकदा कळलं की उत्तरं सोपी होतात.

अनेकदा आपला दुषित दृष्टीकोन हाच एक मोठा अडथळा असतो.

आपण जसे आहोत तशी समोरची व्यक्ती नसेल ,

तर आपला अपेक्षाभंग ठरलेला असतो.

पण आपणही समोरच्या अपेक्षांमध्ये उतरतो का हा एक विचार करण्यासारखा विषय आहे.

वेगळेपण आहे म्हणून नात्यांमध्ये सौंदर्य आहे...

सगळेच सारखे असतील तर आयुष्य किती कंटाळवाणे ,
नीरस होईल ?

उदास व्यक्तीच्या
सोबत उदास माणूस
कस वाटत ?

प्रत्येकाने आयुष्याचा आनंद पुरेपूर घ्यावा ,
एकट राहू नये
ह्यासाठी
मैत्री , जोडीदार , सहचर अशा गोष्टी उदयास आल्या
पण आपण मात्र आपल्या व्यक्तीवर टीका करण्यात इतके मशगुल होतो की त्यांच्या वेगळेपणातील सौदर्य बघण्याची तसदी कधी घेत नाही.

आपलं माणूस थोडसं वेडगळ आहे ,वेगळं आहे
पण
गोड आणि प्रिय आहे असा विचार करायला सुरवात केली
की त्याचं वेगळेपण सहज आपल्यामध्ये सामावून जात.

अनुरूप शब्दाचा अर्थ हा कधीच एकसारखे असा होत नाही न ?

एकमेकांना अनुरूप म्हणजेच
जिथे एक कमी तिथे त्याची कमतरता दुसरा भरून काढतो
कधी
गुणांनी, कधी स्वभावाने, कधी विचारांनी....

म्हणूनच विविधतेत एकता असते.

ह्या वेगळेपणातूनच एक सुंदर , संवेदेनशील आणि मोहक नातं निर्माण होतं जे आपल्याला जपते
आणि ज्याला जीवापाड जपण्यासाठी आपण धडपडतो ......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा