शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

आनंदाचं देणं-घेणं

��'गुडमॉर्निंग', 'सुप्रभात' अशा सुंदर शब्दां च्या देवाणघेवाणीतून आपल्या दिवसाची सुरुवात होत असेल, तर ती किती आनंददायी ठरू शकते ? कारण हाच 'सुप्रभात' शब्द एक चांगला मूड बनवतो.
��मूड चांगला असला, की आपल्या हातून कार्य चांगले घडते. चांगल्या कामाने दिवस चांगला जातो. आणि दिवस चांगला जात असला, की आपण आनंदी होतो आणि आपण आनंदी असलो,की आपल्या सहवासा तला प्रत्येक जीवही आनंदी होऊ लागतो.
��आनंदाची ही अनमोल ठेव आपल्याला कुठल्याही बँकेत डिपॉझिट वा विड्रॉ करता येत नाही. फक्त पुन्हा पुन्हा मिळवता तेवढी येते. कारण या व्यवहाराला स्वार्थस्पर्श नसतो. केवळ 'देणं' तेही आनंदाचं, एवढंच त्या जिवा ला ठाऊक असते. म्हणून आनंद हा मिळत नसतो, तो मिळवावाच लागतो. तो देता येतो, घेता येतो, फक्त छोट्याछोट्या गोष्टींत तो शोधावा लागतो..!!

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा