ईडा पीडा जाउ दे बळिचे राज्य येऊ दे ……आम्ही सर्व बहुजन म्हणतो पण कोण हा बळी...? का वाट बघतोय आम्ही त्याच्या राज्याची.... तो ईतका चांगला होता तर वामनाने त्यास का मारले व त्याच्या मरणाचा दिवस आम्ही दिवाळी म्हणुन का साजरा करतोय तर बळी हा नाग राजा होता त्याचे राज्य महाराष्ट्रावर होते एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार निट चालावा म्हणुन राज्याचे नऊ विभाग केले त्यास नउ खंड म्हणतात नउ खंडाचे त्याने नउ आधिकारी नेमले होते त्याना खंडेराव असे म्हटले जाई जेजुरीचा त्यापैकिच एक खंडोबा खंडोबाने(जेजुरिच्या) ब्राम्हण मल्लाना हारवले होते त्यास मल्हारी म्हनत व तो दुश्मनावर समोरुन हल्ला करी पाठमोर्या शञुवर तो हल्ला करत नसे म्हणुन त्यास मार्तंड असेही म्हटले जाई त्याच्या हाताखाली महसुल आधिकारी असायचा त्यास हिंदुनी म्हसोबा बनवल तसेच सेतसारा वसुल करनार्या आधिकार्यास सातीआसरा आसा अपभ्रंश केला तर अशा गुणी राजाचा बळिराजाचा कारभार अतिशय सुरळित होता त्यामुळे त्यास हरवने आर्याना अश्यक्य झाल्याने त्यानि चाल खेळली त्यानी वामनास पुढे करुन आश्रमास जागा मिळवली बळिराजाचा विश्वास वामनाने संपादित केला आश्रमात शिष्यांना विद्या शिकवीन्याच्या नावाखाली सैन्याची जमवा जमव केली नंतर बळिराजाचे सर्व सैन्य मोहिमेवर राज्या बाहेर गेल्याचा डाव साधला साधुंच्या वेश्यातील सैनिकानी बळिराज्याच्या महालावर हल्ला केला तरि कमी सैन्यानिशी बळिने 20 दिवस झुंज दिली अखेर विरगती प्राप्त झाली तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा ब्राम्हणानी मोठा ऊत्सव साजरा केला घरावर रोषनाई केली आतिषबाजी केली पण त्यानंतर बाहेर गेलेलं बळिचं सैन्य परत आलं वामनाला माञ पळती भुई थोडि झालि तो पळुन डोंगरावर लपुन बसला तरी त्यास ठार मारले
( संदर्भ - गुलामगिरी )
गुलामगीरी - जोतीराव गोविंदराव फुले
बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५
बळिराजाचा खरा इतिहास
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा