बर का!!
सय म्हणजे आठवण
अन आठवण येते तेव्हा डोळे सहज पानावतात.
डोळे पानावतात तेव्हा ती आठवणीतली व्यक्ती ही त्या तोडीची असणारच.
काय असत--
आई तर मुलांसांठी जीव ओवाळून टाकतेच.
पण त्याच तोडीची आणखी एक प्रती आई असते जेष्ठ भगिनी.
मला तशा जेष्ठ दोन भगिनी.
पण समज येण्याच्या आतच
ताईचे लग्न झाले.
अन आम्ही सापडलो आक्काच्या तावडीत.
मोठ्या भावापेक्षा सर्वाची नजर माझ्या कडे.
नजर सुद्धा अशी तशी नाही ; त्या नजरेला साथ नानाच्या नजरेची .
नाना म्हणजे माझे जीवणातले मार्गदर्शक.समाज कामाची घराघराची ईत्यंभुत माहिती देवून वारसा चालवण्यासाठीचे गुरू.
कारण त्यांचेच मार्गदर्शनावर आजपर्यंतची यशस्वी घौडदौड सुरू आहे.
पण ते छत्र भंगवंताने हिरावल्या नतंर पाठीमागे खंबीर ऊभी रहाणारी आक्का! होय आक्का!!!
सवयच अशी अंगवळणी पडली की उठता बसता आक्काचा जप!
आंघोळ घालणारी आक्का;
जेवू घालणारी आक्का;
धपाटा घालणारी आक्का;
नजरे आड झाल्यावर जीवाची घालमेल करणारी आक्काच.
लग्न होवून सासरी नांदतांना आम्हाला काही कमी पडू देवू नये म्हणून वडिलांसी हुज्जत घालणारी.चांगल्या गोष्टिंसाठी प्रोत्साहन देणारी आक्काच.
आण्णा हे नामाभिधान सुद्धा आक्काचेच.
तिसरीत असतानांच आक्काचे लग्न झाले तेव्हापासून डोळे मात्र आक्काच्या प्रतिक्षेत.
पत्र व्यवहार माझ्याच कडे.
आक्काला पत्र घातले न दहा दिवसात जिजाजींकडून ऊत्तर आले नाही असं कधी घडलेच नाही.कळत नकळत त्यांचा ही माझ्याकडे ओढा वाढला.प्रेमाचा वर्षाव ; अभ्यासाबद्दलचे प्रोत्साहन: आई वडिलांबाबत जबाबदारीची जाणीव प्रत्येक पत्रात ओत पोत भरलेली.य
पण त्यातच सखदुखाची विचारपूस अन एकंमेकासाठी
धावपळ.
ती सवय ईतकी लागली की; आण्णाला ताप आलाय;
आण्णा सायकली वरून पडला;
आण्णा ला आठवण येतेय;
काय सांगू ---
आक्का चटकन हजर!
दिवसा मागून दिवस जात राहिले.
मेहूणे एके दिवशी दुखःच्या सागरात लोटून गेले.
त्यांच्या समक्षच भाचवंड सुखीसंपंन्न झालेले.
त्यातच २००८चे वर्ष शेगाव ला महाराजाच्या दर्शनाला निघालोय .
मोबाईलची टूकटूक झाली आक्काला दवाखान्यात दाखल केल्याचा फोन .
जीवाची घालंमेल वीस दिवसांनीच आक्का शांत झाली.तीही तुझ्याशी मला खूप बोलायचे रे म्हणत न बोलताच गेली.
तेव्हा पासून वर्षातिल दोन सण आठवणीने डोळ्यात पाणी आणतात.
मात्र आज एका कुत्र्याने दिलेल्या शिक्षेतून सावरण्या साठी हितचिंतकांचे फोन खणखणत राहिले अन मी मात्र सिव्हील हॉस्पिटल मध्ये
माझ्या साठी धावत येणारी आक्का येते की काय म्हणून डोळे रस्त्यातडे आस लावून बसलेत.
कधिच येणार नाही हे माहित असून सुद्धा!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा