......
कराेडो रुपयाचे घोटाळे करुन
नेते नाही देत डकार,
समाजाला दिसतो फक्त
इथे शिक्षकाचाच पगार
दहा टक्के शिक्षक
शिकवत नसलेतरी
नव्वद टक्के शिक्षक शिकवितात
सर्व शिक्षक आपली कर्तव्ये
इमानदारीने बजावितात
शिक्षकच देत असतो
विद्यार्थांच्या जिवनाला आकार।।1।।
समाजाला दिसतो फक्त
इथे शिक्षकाचाच पगार
कोर्ट कचेरी कार्यालये
जिकडेतिकडे घाेटाळे
सर्वांनी मिळून केले
देशाचे वाटोळे
गल्लीपासून तर दिल्ली पर्यंत
सर्वाना भ्रष्टाचाराचा आजार।।2।।
समाजाला दिसतो फक्त
इथे शिक्षकाचाच पगार
निवडणुक ,बांधकाम, प्रशिक्षणे
सर्व कामे शिक्षक करतो
वरिष्ठांच्या कसल्याही आदेशांचे
तंतोतंत पालनकरतो
कुठल्याही शाळाबाह्य कामाला
नसतो शिक्षकाचा नकार।।3।।
समाजाला दिसतो फक्त
इथे शिक्षकाचाच पगार
किती वाजता शाळेत यायचे
हे शिक्षकाला सांगतो
अष्टौप्रहर झोपणारा
जो तो शिक्षकाची अब्रू
वेशीवर टांगतो
शिक्षकच असतो समाजाचा आधार
याचा प्रत्येकाने करावा विचार
म्हणून तर काढू नये कधी
शिक्षकाचा पगार
@शिक्षकाचा पगार.....
ही कविता कोणी लिहिली? ते माहित नाही पण ज्या कुणी लिहिली त्यांना प्रणाम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा