मंगळवार, ३ मे, २०१६

टांगीनाथ धाम

टांगीनाथ धाम :- इथे आज सुद्धा आहे परशुरामांचा परशु
भारत हा चमत्कारांनी भरलेला देश आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही
ना काही चमत्कारिक वस्तू दिसतेच.संस्कृतीने भरलेल्या ह्या देशात खुप अशा घटना ज्यांचा उल्लेख वेद आणि पुराणांत असून त्या कुठे तरी पुराव्यााच्या स्वरूपात आढळतांना दिसतात .आज आपण अशाच एका जागेची माहीती घेणार आहोत जी जागा झारखंड राज्यात असून तिथे आजही भगवान परशुरामांचा परशु दृष्टीस पडतो.हा तोच परशु आहे ज्याने परशुरामांनी पृथ्वीवरील अधर्मीय प्रवृत्तीचा पराभव करून धर्माचे रक्षण केले.
टांगीनाथ धाम झारखंड राज्यात गुमला शहरापासून ७५ कि.मी.आणि रांची शहरापासून १५० कि.मी.अंतरावर वसलेल्या घनदाट जंगलाच्या मधोमध आहे. इथे आज ही भार्गवरामांचा परशु जमिनित गाडलेला आहे.
परशुला झारखंडच्या भाषेत टांगी म्हटल जात. ह्यावरूनच ह्या जागेत नाव टांगीनाथ अस पडल.त्या जागी श्री परशुरामांचे पदचिन्ह सुद्धा दिसतात.
श्री परशुराम आणि टांगीनाथ ह्यांची अख्यायिका:-
सितास्वयंवरा वेळी मर्यादा पुरूषोत्तमाच्या हातून जेव्हा महादेवाचं धनुष्य भंग पावत आणि हे जेव्हा परशुरामांना कळत तेव्हा ते क्रोधावस्थेत तिथे येतात आणि रामावर त्या क्रोधाचा वर्षाव करतात परंतु ह्या क्रोधाला राम शांतपणे सामोरे जात असतामना लक्षमणाला मात्र ते सहन होत नाही व तिथे लक्ष्मण आणि श्रीपरशुराम ह्यांच्यात शाब्दिक द्वंद होत त्यावेळी श्री परशुरामांना ज्ञात होत की श्रीराम हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात सृष्टी पालनकरता ज्यांचा अवतार आपण स्वतः ही आहोत अशा विष्णुंचाच अवतार आहे तेव्हा स्वतःच्या अशा वागण्याच्या त्यांना पश्चाताप होतो व त्याच प्रायश्चित करण्यासाठी ते तपश्चर्येला एका घनदाट वनात जातात .इथे येऊन ते महादेवाची स्थापना करतात..व तिथे तपश्चर्येस बसतात बसतेवेळी त्यांच्याजवळील परशु ते जमिनीत गाडतात..ह्याच जागेला आज टांगिनाथ म्हणून ओळखले जाते..
जागेसंबंधित काही आश्चर्यकारक गोष्टी :-
१)इथे असलेल्या परशुबद्दल सर्वात आश्चर्यजनक बाब आहे ती म्हणजे हजारो वर्ष सतत हवा आणि पाणी ह्यांच्या संपर्कात राहून ही त्या परशुला अजून ही गंज चढलेला नाही आहे त्या अवस्थतेत अजून ही सुस्थितीत आहे.
२) दुसर आश्चर्य म्हणजे जमिनीत गाडला गेलेला परशु किती खोलवर आहे ह्याची अजूनही निश्चीती नाही पण हा परशु अंदाजे १७ फुट असावा असा अनुमान आहे..
३) सांगितल जात कीएक वेळा ह्या परिसरात राहणाऱ्या व लोहार काम करणाऱ्या समाजातील काही लोकांनी लोखंड मिळवण्याचा हेतूने परशु ला कापण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी ठरले.उलट तसा प्रयत्न करणाऱ्यांचा एक एक करून मृत्यू होऊ लागला ह्याने भयभीत झालेली त्या जमातीने जसा तो परिसर सोडला तसा आजही त्या परिसराच्या १५ कि.मी च्या घऱ्यात अजून ही लोहार जातीचे लोक राहत नाही.
सन १९८९ मध्ये पुरातत्व विभागाद्वारे केलेल्या खोदकामात सोने चांदीचे आभुषणांसह अनेक मौल्यवान व पुरातन वस्तू आढळून आल्या उदा.हिरे जडीत मुकुट चांदीचे अर्धगोलाकार शिक्के कानात घालण्यात येणारी सोन्याची बाळी तांब्याचा डबा ज्यात काळीतीळ आणि तांदूळ होते .ह्या सगळ्या गोष्टी आजही डमुरी येथील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत...
टांगीनाथ येथे आढळलेल्या असंख्य अवशेष व वस्तूंवरून एक बाब ध्यानात येत ती म्हणजे हे स्थळ कधीकाळी हिंदूच एक प्रमुख तिर्थ स्थळ असाव . सरकारची उदासिनता आणि परिसरात असेलेल्या नक्षलवादाच्या प्रभावामुळे ह्या क्षेत्राकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल आहे. त्यामुळे लोकांपर्यंत ह्या परशुरामांच्या पदस्पर्शाने व सहवासाने पवित्र झालेल्या ह्या तिर्थक्षेत्राची माहीती लोकापर्यंतलपोहचण शक्य झालेले दिसत नाही..कदाचीत सरकारने ह्याकामी लक्ष घातले तर ह्या संबंधित अधिक माहीती वैदिक महत्व लोकांना कळू शकते.
अशा ह्या टांगीनाथ क्षेत्री असलेल्या परशुचा आणि पुरात्तव विभागाला मिळालेल्या अमुल्य वस्तुंचा फोटो सोबत जोडला आहे...
जय परशुराम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा