सोमवार, ९ मे, २०१६

☄वाह रे सोशल मिडीया अन मातृदिन


☄वाह रे सोशल मिडीया अन मातृदिन ....
          काल फेसबुक आणि वॉट्सअॅप या सोशल साइट्सवर *मातृदिन* खूप उत्साहात साजरा होतांना दिसतोय.
हजारो मेसेज "आई" ला प्रेमापोटी शुभेच्छा दिलेले आले.

||स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी||

पण खरचं आपण एवढे प्रेम त्या जन्मदात्या आईवर करतो का?
*||मातृदेवो भव||*
लहान पणी आपला सांभाळ करणारी आपल्याला बोलता येत नसतांनाही आपल्याला काय हवे हे समजून घेणारी "आई",
आपण आजारी पडलो तर रात्रभर जागून आपली काळजी करणारी "आई"
कोणत्याही विद्यापीठाची पदवी नसतांनाही संपुर्ण कुटुंब व्यवस्था सुरळीत पार पाडणारी आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य करणारी घरातील सर्वात महान व्यक्तीमत्व म्हणजे" आई "
पण तिच आई अचानक मोठ्यापणी नकोशी का वाटते?
भारतात अनेक आई - वडील मुल असतांना सुद्धा *वृद्धाश्रमात* आहेत परंतू हे वृद्धाश्रमात जाण्या मागची कारणे ही शुल्लक असतात असो.
आज अनेक मुल आणि त्यांचे कुटुंबीय दर विकेंड प्रमाणे या विकेंडला एका नवीन ठिकाणी भेट द्यायला जातील कदाचित ते म्हणजे आईला ठेवलेल्या वृद्धाश्रमात आजचा दिवस तिच्यासोबत घालवतील काही तरी भेटवस्तू घेऊन जातील आणि आपले कर्तव्य पार पाडल्यासारखे समजतील.
एकच दिवस मातृदिन साजरा करण्यापेक्षा वर्षभर आईसोबत आनंदाने राहिले तर फक्त आयुष्यातला हा एकच दिवस साजरा करण्याची आवश्यकता पडणार नाही.
*सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!*
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा