गुरुवार, २६ मे, २०१६

स्पर्धक आणि विरोधक


☄स्पर्धक आणि विरोधक

आपण आपले जीवन जगत असताना आपल्याला स्पर्धक आणि विरोधक यांची गरज असतेच.

स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील ठेवतात. तर विरोधक आपल्याला कायम सतर्क आणि सावधान बनवतात.

हे दोघे मिळून कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या प्रगतिला कायमच पोषक वातावरण तयार करत असतात.

लक्षात ठेवा, ठरवुन कुणाला स्पर्धक किंवा विरोधक करता येत नाही, आणि हे दोघे आयुष्यात यावेत यासाठी कष्ट ही करावे लागत नाहीत. म्हणुन त्यांच्यावर चीडू नका, उलट त्यांचे स्वागतच करा.

कारण त्यांच्या मुळेच आपल्याला  चांगले, नव्हे नव्हे अजुन चांगले करण्याची प्रेरणा मिळते.
हो ना ?
शुभरात्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा