रविवार, १५ मे, २०१६

शेळी पालन

शेतीबरोबरच शेती पूरक उद्योग केल्यास नेहमीच फायदेशिर ठरतो, कमी खर्चात, कमी व्यवस्थापन कौशल्य वापरुन करता येणार असा व्यवसाय म्हणजे शेळी पालन. असे असले तरीही ह्या व्यवसायाचे शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन केल्यास आपल्या मिळकतीत अधिक भर पडु शकते.

प्रस्तावना:

भारतीय अर्थव्यवस्थेत शेळयांचे महत्व जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे.
शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर आहे.
देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते.
आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.

शेळयांच्या जाती

भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल,उस्मानाबादी, सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात.
विदेषी जातीच्या शेळया उदा. सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात.
अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते.
आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.
शेळी

मांसासाठी व दूधासाठी उत्तंम जातीच्या् शेळ्या खालीलप्रमाणे

उस्मानाबादी- अर्धबंदीस्त् शेळीपालनासाठी उपयुक्तम[मांसासाठी]
संगमनेरी – अर्धबंदीस्तश शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी व दूधासाठी]
सिरोही – अर्धबंदीस्तश शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी व दूधासाठी]
बोएर – बंदीस्तध शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी]
सानेन- बंदीस्तध शेळीपालनासाठी उपयुक्तप[दूधासाठी]
कोकण कन्याळ: अर्धबंदीस्तस शेळीपालनासाठी उपयुक्तम[मांसासाठी]
बंदीस्त शेळीपालन  –
शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे असा सर्व साधारण समज आहे व तो काही प्रमाणात खराही आहे जर आपण शेळयांना जंगलात चरण्याकरीता न सोडता त्यांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.

Goat1

अर्धबंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता –
अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणजे चराऊ कुरणांचे उपलब्धतेनुसार शेळ्यांना पाच ते सात तास बाहेर चारून संध्याकाळी गोठ्यात आल्यावर थोडाफार चारा तसेच पूरक आहार देऊन शेळीपालन करणे. या पद्धतीमध्ये शेळ्यांचा आहारावरचा खर्च 60 ते 70 टक्के कमी होतो. बागायती भागात जेथे चराऊ कुरणांचा तुटवडा आहे तेथे हे शेळीपालन शक्‍य होते.

goat2

बंदीस्त / अर्धबंदीस्त शेळीचे व्यवस्थापन –

शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया प-हाटया यांच्या सहायाने करावे.
प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी.
कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा
गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी घ्यावी.
करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी.
दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत.
शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी
आरोग्याच्यादृष्टीने वेळच्या वेळी लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होऊन अपेक्षित फायदा शेळीपालकाला मिळू शकतो.
शेळ्यांचे ऊन – पावसापासून संरक्षण करता येईल, अशा पद्धतीने गोठा बांधावा.
शेळ्यांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत. मल-मूत्राची रोजच्या रोज विल्हेवाट लावावी. गोठ्यात स्वच्छ पाणी उपलब्ध असावे. गोठ्यात हवा खेळती असावी.
बंदिस्त शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्यआक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूणघास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी.
त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुश्याय चा वापर करावा.
Goat

शेळ्या आणि बोकडांची निवड :

शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे, म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी.
शेळ्या आणि बोकडांची निवड शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात.
एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते.
तिची आई जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले असते.
दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे.
दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी, टवटवीत व चपळ असावी.
शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे.
केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. भरपूर छाती असावी. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल.
शेळीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत.
शक्यतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी.
पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी.
तिला कासदाह तर नाही ना, याची तपासणी करावी.
दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. करडे रोगमुक्त, तसेच परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावीत.
बोकडाची निवड कळपात जन्मणाऱ्या शेळ्यांचे 50 टक्के गुणधर्म बोकडांवर अवलंबून असतात, म्हणून कळपाची सुधारणा बऱ्याच प्रमाणात पैदाशीच्या बोकडांवर अवलंबून असते.
शुद्ध जातीचाच बोकड शक्यपतो विकत घ्यावा. ते न जमल्यास निदान सुधारित जातीचा बोकड घ्यावा.
विकायला आलेल्या बोकडांपैकी सर्वांत मोठा डौलदार व निरोगी बोकड निवडावा. त्या
ची छाती भरदार असावी व पायांत भरपूर अंतर असावे. शरीराचा मागील भाग जास्त मोठा व उंच असावा. पाय मजबूत व खूर उंच असावेत.
बोकड मारका नसावा. तो चपळ व माजावर आलेल्या शेळीकडे चटकन आकर्षित होणारा असावा.
डोके व खांद्याचा भाग दणकट, थोराड व नराची लक्षणे दाखवणारा असावा. या लक्षणांवरून पुढील पिढीत चांगले गुणधर्म संक्रमित होण्याची शक्य ता कळते.

शेळीपालनाचे अर्थशास्त्र:

१)      अनावर्ती खर्च

शेळ्याची घरे १५ मि × १५ मि = २२५ चौ. मिटर प्रति चौरस मिटर ७००/- रु १५,७५० /-
शेळ्याची खरेदी प्रतिशेळी (देशी) १००० रु. व बोकड १७०० रु.( सुधारीत जातींचे) २३,४०० /-
किरकोळ साहित्य टब ,बादल्या ,दोर १,००० /-
एकंदर अनावर्ती खर्च ४०,१५० /-

२) आवर्ती खर्च

अ) खाद्य : २२ शेळ्या
१५० ग्रॅम प्रति शेळी × २२ = ३.३ किलो प्रतिदिन × ५४० ( १८ महिने) = १८ किंटल × ६५० /- रु . प्रति किंटल

पिलांकरिता खाद्य सरासरी २५ पिले प्रति वेत तर १८ महिन्यात २ वेळा म्हणून एकंदर पिले ५०× ५० ग्रॅम प्रति पिलु प्रति दिन , २५०० ग्रॅम  २.५ किलो × सहा महिने ४५० किलो × ६०० रु. प्रति क्विंटल


१७,००० /-

२,९०० /-

ब) हिरवा चाराः  २० शेळ्या + २ बोकड × १.५ किलो = ३३१ किलो × ५४० दिवस (१८ महीने) = १८ टन तर पिल्लांना १/२ किलो प्रमाणे ९० किलो × ५० पिले ४.५ ग्रॅम एकंदर २२.५ टन (१००० रु. टनाप्रमाणे)

२२,५००/-

क) वाळलेले गवत प्रतिशेळी २५० ग्रॅम तर पिले १०० ग्रॅम एकंदर ३ टन ८०० रु.टनाप्रमाणे २,४००/-
ड) मजुरी – १ मजुर ४० रु. प्रतिदिनाप्रमाणे ५४० दिवस २१,६००/-
इ) विद्युत खर्च प्रतिमाह रु. प्रमाणे १८ महीने ३,६००/-
ई) शेळ्याचा विमा- २२ शेळ्या किंमतीनूसार (४० रु. प्रति हजार प्रमाणे) १,०००/-
उ) औषधी २,०००/-
ऊ) किरकोळ खर्च २,०००/-
एकदंर आवर्ती  खर्च ७५,०००/-

उत्त्पन्न

अ) एकंदर पिल्ले ५० यातून १० टक्के मृत्युचे प्रमाण ( ५० -५ ) = पिले यात २२ नर व २३ मादा २२ नर १२०० रु. प्रमाणे, २३ मादा ९७० रु. प्रमाणे ४७,१००/-
ब) दुध विक्री २० शेळ्याचे सरासरी प्रती वेतात ( ९० दिवसात ) १०० लिटर प्रमाणे २ वेतात २०० लिटर × २० शेळ्या ७ रु. लिटर प्रमाणे २८,०००/-
क) बारदाना ( रिकामी पोती ) ७५ × १८ १,३५०/-
ड) खत विक्री : २२ शेळ्या व ५० पिले अंदाजे ५५ गाड्या × २५० रु. प्रतिगाडी १३,७५०/-
एकदंर उत्त्पन्न ९०,२००/-

गाभण शेळीची जोपासना –

गाभण शेळीची व्यवस्था स्वतंत्ररीत्या करावी.
तिला ओला व सुका चारा आणि मुबलक स्वच्छ पाणी यांची योग्य प्रमाणात व्यवस्था करावी.
शेवटच्या दोन – तीन महिन्यांत 200 ते 250 ग्रॅम पोषण आहार द्यावा.
शेळी नैसर्गिकपणे विते; मात्र काही घटनांमध्ये वैद्यकीय मदत आवश्य क असते.
दुभत्या शेळीची जोपासना –

दुभत्या शेळ्यांना शारीरिक गरजेसाठी लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा अतिरिक्त ऊर्जेची आवश्ययकता भासते.
म्हणून त्यांना ओल्या व सुक्याे चाऱ्यासोबतच 100 ग्रॅम खुराक प्रति लिटर दुधामागे जास्त द्यावा.
चारा देताना त्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ व खनिजद्रव्ये मिसळून द्यावीत.
करडांची जोपासना –

करडाच्या जन्मानंतर शेळी त्या पिल्लाला चाटू लागते; मात्र असे न घडल्यास कपड्याने करडास स्वच्छ पुसून घ्यावे.
नाका-तोंडातील चिकट द्रव स्वच्छ करून घ्यावा.
नाळ स्वच्छ ब्लेडने कापून टिंक्च र आयोडीन लावावे.
करडास एक – दोन तासांतच शेळीचा चीक पाजावा.
करडाने नैसर्गिकरीत्या चीक न प्यायल्यास त्याला तो काढून पाजावा.
दोन – तीन आठवड्यांनंतर त्याला कोवळा पाला द्यावा. पहिले तीन – चार महिने दूध पाजावे.
त्यानंतर मात्र त्याला शेळीपासून तोडून चरण्यास सोडावे.
पैदाशीच्या बोकडाची जोपासना

पैदाशीकरिता योग्य शारीरिक व वांशिक गुण असणाऱ्या निरोगी बोकडाची निवड करावी.
निवड करताना त्याचे वय एक वर्षापेक्षा जास्त असावे, तो मारका नसावा.
अशा बोकडास योग्य प्रमाणात हिरवा, वाळलेला चारा, खुराक व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.
शासकिय योजना :

राज्यातील ग्रामीण बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी 40 + 2 शेळयांचे 50% अनुदानावर गट वाटप करणे ही योजना राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे.
सदर योजनेमध्ये एकूण 660 गट वाटप करायचे आहे.
या योजनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र (मुंबई व कोकण आणि अवर्षण प्रवण भाग वगळून) या योजनेमध्ये लाभार्थीची निवड जिल्हा स्तरीय समिती मार्फत या महामंडळाचे अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त यांचे स्तरावर करण्यांत येईल.
राज्यातील शेळी-मेंढी पालन करणा-या सहकारी संस्था:-
महाराष्ट्रात एकण २२५० शेळी-मेंढयांच्या सहकारी संस्था आहेत. त्यांचा तपशिल खालिलप्रमाणे
१. पश्चिम महाराष्ट्र – ४५०
२. मराठवाडा – ३८०
३. विदर्भ – १७०
४. कोकण – २५
५. खानदेश – १२००
एकूण – २२२५

महाराष्ट्र राज्यातील शेळया-मेंढयासाठी कार्यरत असलेल्या अशासकीय संस्था
१. निंबकर अग्रिकल्चर रिसर्च इन्सिटयुट (NARI) फलटण.
२. BAIF डेव्हलपमेंट रिसर्च फॉऊंडेशन उरळीकांचन पुणे.
३. अंतरा, पुणे.
४. BOSCO, ग्रामिण विकास केंद्र, कडेगांव, नगर-पुणे- मार्ग, अहमदनगर.
५. रुरल अग्रिकल्चर रिसर्च इन्सिटयुट नारायणराव (RAIN).
६. कृषी विज्ञान केंद्र बारामती जिल्हा पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा