!! श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती !!
जय जय सद्गुरु स्वामी समर्थाँ
आरती करु गुरुवर्या रे॥
अगाध महिमा तव चरणांचा
वर्णाया मती दे यारे॥धृ॥
अक्कलकोटी वास करुनिया
दाविली अघटीत चर्या रे ॥
लीलापाशे बध्द करुनिया
तोडिले भवभया रे॥१॥
यवने पुशिले स्वामी कहाँ है?
अक्कलकोटी पहा रे ॥
समाधिसुख ते भोगुनी बोले
धन्य स्वामीवर्या रे॥२॥
जाणसी मनीचे सर्व समर्थाँ
विनवू किती भव हरा रे ॥
इतुके देई दीन दयाळा
नच तवपद अंतरा रे॥३॥
जय जय सद्गुरु स्वामी समर्थाँ
आरती करु गुरुवर्या रे॥
अगाध महिमा तव चरणांचा
वर्णाया मती दे यारे॥धृ॥
सर्वांना शुभ संध्या......!!
स्वामी संध्या......!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा