दावा किती साधा अन सरळ शब्द आहे.
पण या साद्या शब्दाची दाहकता मात्र फार तिव्र आहे.
या शब्दाच्या भयानकतेचे चटके बहुतेकांनी येनकेन प्रकारे अनुभवलेच असतिल.
दावा हा शब्द फिर्यादिशी निगडित आहे.
कोर्टात फिर्याद देणे म्हणजेच दावा दाखल करणे होय.
एकदाका दावा दाखल झाला तर मग देवालयापेक्षा कोर्टाच्या फेय्राच जास्त होतात.एवढेच नाही तर वकिलाची फी भरतांना चांगल्या मातब्बरांची भंबेरी ऊडाल्याची ऊदाहरणे आहेत.
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे जुन्या जाणत्यांनीच नमुद करून ठेवले असून अपेक्षा भंगाचे दुःख पेलवण्याची ताकद असेल तरच दावा दाखल करावा.
अन दुसरा दावा म्हणजे दावा करणे.
म्हणजे आत्मविश्वासपूर्वक ठाम बोलणे.
बय्राच मंडळींना दावा करण्याची वाईट सवय असते.
काहीतर मानवाला पशूच्या पदव्या सहज देवून त्याच्या पराक्रमाची गाथा ऊभी करतात.
गाढवापासून सिंहा पर्यंतच्या पदव्या सहजगत्या दावा करणारे देत असतात.
हे दावा करणारे नेहमी कुणालातरी कमी लेखतिल व कुणाला केव्हा डोक्यावर घेतिल याचा अंदाजच येत नाही.
अर्थ तज्ञापासून मानवाच्या कल्याणा पर्यंतचे दावा करणारे या जगात आहेत.
मात्र यांचा दावा केव्हा फोल ठरेल वा ठरविला जाईल याचे भान दावा करणाय्रांना नसते.मिडीयाद्वारे प्रसिद्धिच्या झोतात रहाणे एवढाच या दावा करणाय्रांचा ऊद्देश असतो.
दावा करण्यात नेते मंडळिंचा हात कुणीही धरू शकत नाही.
त्यांच्या दाव्याला भुलून च त्यांचे भक्तगण नेत्याच्या मागून फरपटत जात असतात.
एक वेळ कोर्टाचा दावा परवडला.पण दावा करणारा नेता परवडत नाही.
कोर्टातिल दाव्यात वैयक्तिक मुखभंग होतो.
पण या दावा करणाय्रा बरोबर अनेकांचा मुखभंग झाल्याशिवाय रहात नाही.
शुभ प्रभात!!
शुभ दिन!!!!!
जय शंभो!!!!!!!
मंगळवार, २४ मे, २०१६
दावा - श्री.भामरे आण्णा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा