बुधवार, ४ मे, २०१६

अध्यात्मात ३ गोष्टी महत्वाच्या


अध्यात्मात ३ गोष्टी महत्वाच्या आहेत १) विश्वास २) दृष्टीकोन ३) स्वीकार भाव

१) विश्वास : ज्यावेळेस आपण ज्ञानार्जन करत असतो.त्यावेळेस जे कोणी आपल्याला ज्ञान प्रदान करत असेल त्या गुरुवर किवा इतर कोणावरही तुमचा सर्वप्रथम विश्वास असणे महत्वाचे आहे कारण हीच गोष्ट तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रत पोहचविण्यास मदत करणार कारण ज्याठिकाणी विश्वास असतो त्या ठिकाणी अशक्यातली अशक्य गोष्ट शक्य होते. कारण जो तुम्हाला ज्ञान देणारा असतो तो तुम्हाला जे हवे आहे ते सर्व तोच देणारा असतो. म्हणून त्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याची गरज आहे.

२) दृष्टीकोन :- जे तुम्हाला ज्ञान देत असतील त्यांनी जी गोष्ट वस्तू तत्व जे काही पाहिली किवा समजली आहे त्याचेच विश्लेषण तुम्हाला ते देत असतात फक्त एवढंच आहे कि त्या वस्तूला किवा तत्वाला प्रत्यक्षात सादर करता येत नाही म्हणून काही गोष्टींचा आधार घेऊन तेच तत्व दाखवण्याचा त्या गुरूचा प्रयत्न असतो.पण आपण त्या दिव्यत्वाला समजू शकत नाही. हि अज्ञानाविरुद्ध लढाई स्वताला स्वताच करावी लागते. ज्यावेळेस तुम्ही सत्य शोधण्यास निघता त्यावेळेस सत्य तुमच्यापर्यंत पोहोचलेले असते पण  ज्या गोष्टींमध्ये ते सांगितले जाते त्या गोष्टींमध्ये आपण गुंतून जातो आणि ते बाजूलाच राहते.म्हणून गोष्टींमध्ये न गुंतता त्यातील भाव महत्वाचा आहे.

स्विकार भाव : ह्या मध्ये मजेशीर गोष्ट अशी आहे कि भाव जागृत होणे खूप कठीण आहे.कारण ज्यावेळेस तुम्ही सत्याचा शोध घेत असता त्यावेळेस ते तिथेच असते आणि तेच मार्गदर्शन करत असते पण आपण मनाद्वारे बुद्धीद्वारे कल्पनेत एवढ्या गोष्टी साठवून घेतो कि ते स्वीकारण्याची ताकदच गमावून बसतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा