श्री सत्यनारायन पुजा विधी चौरंगावर
एक चौरंग, एक पाट, चौरंगाभोवती चार बाजूला चार आंब्याची डगळे (फांदी) लावावेत. चौरंगावर शुभ्र वस्त्र टाकावे. त्यावर मध्यभागी थोडे गहू टाकावे. त्यावर एक कलश , त्यात (कलशात) पाणी भरून ठेवावे , त्यात पाच विड्याची ठेवावीत. त्यावर ताम्हण (तांब्याचे ताट) तांदळाने पुर्ण भरून त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी.
कलशासमोर चौरंगावरती तीन सुपार्या जोड (दोन) पानावर मांडाव्यात.
पहिल्या जोडपानावरची सुपारी गणपतीची दुसर्या जोडपानावरची सुपारी कुलदेवतेची व तिसर्या जोडपानावरची सुपारी वरूण देवतेची.
या प्रमाणे मांडामांड करून सर्वांची पंचोपचार पुजा करावी. आपण पुजेकरीता भरून घेतलेल्या कलशात गंध , अक्षता , फुले टाकावे. मंत्र म्हणून कलश पुजन करावे.
❗पुजेचे साहित्य ❗
१. सत्यनारायनाचा फोटो -१
२. श्री बाळकृष्णाची मुर्ती -१
३. तांब्याचे कलश -२
४. ताम्हण (तांब्याचे) -१
५. सुपारी -३
६. विड्याची पाने -१५
७. नारळ -१
८. तांदूळ - पाव किलो
९. आंब्याचे डगळे - ४
१०. चौरंग -१
११. गहू - अर्धा किलो
१२. हळद
१३. कुंकू
१४. अष्टगंध
१५. अगरबत्ती
१६. कापूर
१७. दिवा
१८. फुले
१९. पांढरा कपडा - १
२०. प्रसादासाठी - शिरा
२१. नैवद्द - अन्नाचा
सत्यनारायन पुजन महिला - पुरुष कुणीही घरच्या घरी करू शकते.
आर्थिक प्रगतीसाठी दर पोर्णिमेला घरी सत्यनारायन पुजन करावे.
अधिक सविस्तर माहीतीकरीता सत्यनारायन पोथी वाचावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा