सोमवार, २ मे, २०१६

नवीन संकल्प करा.

✍��
       ☄आजपासून नवीन संकल्प करा.  ते डायरीत लिहून ठेवा. मित्र परिवारात जाहीर करा. वारंवार ते संकल्प आठवा.
        ☄काही संकल्प ---
१) प्रथम स्वतः वर प्रेम करा.
२) वडिलधा-यांना मान द्या.
३) बचत करायला शिका.
४) निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा.
५) चांगला मित्र परिवार वाढवा.
६) व्यसनांपासून दूर रहा.
७) भक्तीमार्ग अवलंबा.
८) समाजसेवा करा.
९) आपल्या मागे आपली आठवण काढणारी माणसे आहेत, याची सदैव जाणीव ठेवा.
१०) सल्ला घेऊनच प्रत्येक काम करा.
११) आजच्या तरूण पणावरच उद्याचेवृद्धत्व अवलंबून आहे. हे विसरू नका.
१२) मागा म्हणजे मिळेल, आणि शोधा म्हणजे सापडेल. या प्रमाणे वागल्यास पुढेच जाल.
१३) यशोगाथांचे वाचन करा.
१४) नैसर्गिक जीवन जगा.
१५) आयुष्य फार लहान आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या....

☄आदर्श जीवन जगण्यासाठी जरुर वाचा..
1) चूक झाली तर मान्य करा.
2) समोरच्याचे मत विचारात घ्या.
3) चांगल्या कामाची स्तुती करा.
4) आभार मानायला विसरू नका.
5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
6) सतत हसतमुख रहा.
7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
11) कृती पुर्व विचार करा.
12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
13) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
14) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
15) नेहमी सत्याची कास धरा.
16) इतरांना चांगली वागणूक द्या.
17) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.
18) विचार करून बोला.
19) प्रेमाचा आदर करा.
��������������������������������

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा