❗श्री स्वामी समर्थ❗
●|| सेवा कुलदेवीची ||●
भारतीय संस्कृतिप्रमाणे कुलदेवतेचे स्थान सर्वोच्च आहे.
प्रत्येक कुळाची रक्षणकर्ता अशी एक कुलदेवता असते. त्या कुळाच्या सम्पूर्ण पालन-पोषणाची व संरक्षणाची जबाबदारी त्या देवतेवर असते.
पण त्या प्रमाणात तिची सेवा उपासना होने आवश्यक आहे.
●कुलदेवता कशी ओळखावी सेवा कशी करावी याची माहिती दींडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात दिली जाते.
♀कूलदेवतेची सेवा :-
१)नित्य सेवा :- कुलस्त्री ने मंगलवार/शुक्रवार उपवास रोज सप्तशती अध्याय १/२ अध्याय, नवार्ण मंत्र १ माळ्, श्री सूक्त.
२) विशेष सेवा:- चैत्र व अश्विन नवरात्रात अष्टमीपर्यन्त १४ पाठ सप्तशती ग्रंथाचे करावे. (भाग बांधनी, मूळ स्थानावर सन्मान, कुंकू मार्जन, नवचंडी विधी )
■ भाग बांधनी ■
कुलदेवीच्या वाराच्या दिवशी कुलस्त्री ने सकाळी ११ च्या आत देवपूजा अग्निसाक्षिणे पुढील कृती करावी,
देवहार्या समोर एक शुभ्र नव वस्त्र अंथरून त्यावर सव्वा रूपये, हळद-कुंकू च्या छोट्या पुड्या, अक्षतेची पूड़ी, ठेवणे वरील सर्व हातात घेऊन,
कुलदेवतेची मनोभावे प्रार्थना करावी.
आम्हाला मार्गदर्शन नसल्याने तुमची सेवा आमच्या कडून घडली नाही, आता त्या बाबत तू आम्हाला मार्गदर्शन कर, आमची कार्य मार्गी लागल्यावर आम्ही जोडीने तुझ्या मूळ स्थानावर येऊन तुझा सन्मान करू अशी प्रार्थना करावी.
नंतर त्या वस्त्राचे गाठोडे बांधून प्लायस्टिक अथवा पितळीच्या डबित ठेवावे.
त्या डबिला रोज हळद कुंकू वहावे, कार्य झाल्यावर मूळ स्थानावर घेऊन जाने आणि तेथेच सोडून येणे.
★मूळ स्थानावर सन्मान :-
शक्यतो दरवर्षी, प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुलदेवतेचा सन्मान करावा. आधी घरी १४ पाठ करावे.
नंतर हिरवी ९ वार साडी १|मी. खन,सोन्याचे मणी-मंगलसूत्र,खेळना-पाळणा, जोडवेविरोदे,पंचखाद्य,बांगड्या, हळद-कुंकू,हारवेनि, फळ दक्षीणा, इ. वस्तु घेऊन जाऊन अर्पण करुण सन्मान करावा. पुरनाचा नैवद्य दाखवावा.
२१ पुरनाचे दिवे लाऊन आरती करावी. आरतीतील पुरण फ़क्त घरच्या च लोकांनी प्रसाद म्हणून घ्यावे.
घरचा टाक/प्रतिमा देव भेट करण्यास नेणे. पूजा झाल्यावर सरळ आपल्या घरी च येणे इतरत्र कुठल्याही तीर्थक्षेत्री /नातेवाइक कुठे च जाऊ नये.
घरी आल्यावर १ सुवासिनी, १ कुमारिका यांना भोजन देऊन विडा(विडयाच्या पानावर १ रूपये व सुपारी) देने.
बरोबर नेलेल्या घरच्या देवीला मंगलवार/शुक्रवार पाहुन पुरनाचा नैवद्य देवून यात्रा ची सांगता करावी.
★ कुंकू मार्चन विधि ★
३०० ग्राम हलकुण्ड विकत आणून दळुन घेणे त्यात चुना(लाल रंग येइपर्यन्त) घालावा.
व लिम्बु पीळावे. या प्रमाणे करुण मिश्रण सावलीत वाळवावे.
त्याचे कुंकू तयार होते. प्रथम सप्तशती रोज १ याप्रमाने १३ पाठ वाचने.
१४ व्या पाठच्या वेळी वाचतांना प्रत्येक ओवी नंतर नमः म्हणून पाच ही बोटांनी फोटो वर अथवा टाका वर कुंकू वहावे.
सदरच्या कुंकू मधे १ मोरपिस जाळून त्याची रक्षा त्यात मिसळावी, व रोज कुलस्त्री ने सकाळी आपल्या कपाळा वर लावावे.
●नवचंडी विधि ●
सर्वांना माहीत च असेल. अधिक माहितीसाठी जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात संपर्क करने.
(सदरची माहिती प.पु.गुरुवर्य गुरुमाऊलींच्या अमृतमय ज्ञानगंगेतुन)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा