फलित
भामरे आण्णा
आज निळकंठ पत्रिकेचे आगमन झाले.
मुखपृष्ठ मा.मधुकर टंकसाळे साहेबांच्या लेखाने व़्यापलेले.
विषय होता गुरव जाती समाज संघटन.
लेखात जाती च्या व्याप्ती विषयी निर्मीती पासून ऊत्कर्ष वा हानी पर्यत एकेक पैलू ऊलगडले असल्यामुळे समाज जाग्रुतीसाठी अतिशय बोधप्रद.
त्या पैलूंपैकी एका पैलूने मला वडिलांनी केलेली चर्चा आठवली.
गुरव हा महादेव परिवाराचा पुजारी.
पण या समाजाने ऊचनिचतेचा सिद्धांत स्विकारण्याचा विचार केला.
व
गुरव हा ब्राम्हणच सिद्ध करण्यापायी समाजातही विभागणी झाली.
अनेक शाखांपैकी फक्त शैव गुरवांनीच या मुद्यावर भर दिला व ईतर विषयांपासून ईतर शाखा अलिप्त राहिल्या.
त्यात अहिर गुरवांनचा ईतिहास कालानुरूप बदल कसा स्विकारत गेला ते ही आजच्या विज्ञान युगात एक प्रकारे हितकारकच ठरले असे म्हणावे लागेल.
राणाप्रतापांचा पाडाव झाल्यानंतर राजस्थान मधून बरिच मंडळी सैरावैरा पळत सुटली त्यात गुरव ही होते.
चितोडगड गेले नंतर निमच मंदसौर मार्गे रतलाम ऊज्जैन देवास ईदौंर खंडवा करत ही मंडळी अहिर राज्यात प्रविष्ट झाली.
कठिण कर्मकांड करणारा गुरव या खडतर प्रवासात एकेक कर्मकांड कमी करत गेला.मुंज हा विषय रस्त्यातच बाद झाला.
मंदिरे नाहित पोट कसे भरणार मग मिळेल त्या गावात एकेक दोन दोन परिवार थांबत गेला .व गावात जे ही छोटे मोठे मंदिर ; बेलपत्री व वांजत्रीचा व्यवसाय करत करत सोबत मजुरीही करत जीवण कंठत गेला.
अहिर राज्यातिल रहिवासी म्हणून अहिर गुरव म्हणून प्रसिद्धीस पावला.
वर्षामागून वर्षे गेली .ऊज्जैनला शर्मा म्हणून दक्षिण मध्यप्रदेशात नेमाडी व उत्तर महाराष्ट्रात अहिर म्हणून जगणारा हा गुरव .स्थिरत्व प्राप्ती नंतंर आज गुरव समाज ऊन्नती संस्थेच्या माध्यमातून झोय्रा पंचायतितून बाहेर पडला व एकसंघ भावनेतून वाटचाल करता झाला.विसाव्या शतकात गुरव हा ब्राम्हणच हा वाद सुरू झाला.
मात्र स्थानिक परिस्थीतीशीच अनुकूलता दर्शवत झोय्रा पध्दतिच्या नेत्यांनी या वादा पासून अलिप्त रहाणेच पसंत केले.
ऊज्जैनच्या एका कार्यक्रमात गुरव ब्राम्हण बोर्ड पहाता मलाच भाषणाद्वारे जाणीव करून द्यावी लागली की;गुरव ही आपली जात असतांना हा रिकामा ब्राम्हण होण्याचा हव्यास कशासाठी.
आपण आपला गुरवकीचा व्यवसाय नैतिक द्रृष्ट्या केला तर कुणीही तुमच्या कडे बोट दर्शवणार नाही.
जीथे मंदिरे आहेत त्याचे ऊत्पन्न आज ईतरांच्या डोळ्यात सलते तर आपणही कर्तव्य भावनेने काही ऊत्पन्न मंदिर वा परिसर विकासासाठी खर्च केले तर ईतर भाविकही गुरवांची बाजू सांभाळतात.हेही विसरून चालणार नाही.
टंकसाळे साहेबांनी या वादातित विषयाच्या मर्मावरच बोट ठेवल्या मुळे अक्षरशा म्हणावेसे वाटते की ---
या ब्राम्हण होण्याच्या नादापायी तिसेक वर्षाचा जो काळ गेला त्यात समाजाची प्रगती न होता अधोगतीच झाली.व गुरव एकसंघ न होता शाखिय दुरावा वाढला तो या लोकशाहितही अस्तित्वात आहेच असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
गुरुवार, १९ मे, २०१६
फलित- भामरे आण्णा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा