नक्कीच वाचा..
मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..??
1) आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा..
2) मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा..
3) आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा..
4) मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत.. हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा..
5) मित्र असे का वागला हे त्याला न विचारता.. आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा..
6) आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल.. असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा..
7) मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ.. आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा..
8) भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे.. असे आपण ठरवतो तेव्हा..
9) मित्र श्रीमंत झाल्यावर.. आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा..
10) आपला मित्र आता बदलत चालला आहे.. अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा..
11) मित्र बिझी असेल.. त्यालाही त्याच्या अडचणी असतील.. हे आपण विसरायला लागतो तेव्हा..
12) आपल्या मित्राची आपण चार चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा..
13) आपण जसा विचार करतो.. तशाच विचाराने मित्राने वागले पाहिजे.. असा दुराग्रह बनतो तेव्हा..
14) आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे.. हे लोकांना सांगायला हवे.. अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा..
15) खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा..
16) कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा..
17) आपले मित्रांशिवाय काही अडत नाही.. हे आपण नकळत मित्राला दर्शवायला लागतो तेव्हा..
18) आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा..
19) मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही.. याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय.. असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा..
खरं तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते.. तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात.. असे असेल.. तसे झाले असेल.. असे काल्पनिक विचार करीत आपण मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो.. मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते.. पण कुठेतरी गैरसमज, अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते.. चांगली मैत्री बनायला अनेक काळ जावा लागतो.. पण मैत्रीमधील धागे तुटायला एका क्षणाचाही वेळ लागत नाही..
तेव्हा मित्रांनो..!!
तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला माफ करा.. आणि तुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राची क्षमा मागायला लाजू नका..!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा