सोमवार, ९ मे, २०१६

खान्देश नि आखाजी

"
"जळगाव,धुळे,नंदुरबार या जिल्हास्ना भाग म्हणजे खान्देस.वैशाख शुद्ध तृतीया ले आखाजी अस म्हणतस .आखाजी ना रोज परशुराम ना जन्म व्हयेल से ."तयारी आखाजीनी "खान्देशनी प्रत्येक बाई वडे,पापड .कुरड्या,सेवायाकाराम्हा मग्न रातास.आखाजीना सन साठे घर मधला पात्रसना डब्बा ,भांडा ,चादरी, गोधड्यानदीवर ली जैसन धुई आंतस .आखाजी साठे प्रत्येक ना घर "संजोरया"आणि" घुन्या " करतस .."आखाजी पितरांची "आखाजी जस मौज मा ना दिवस से तसा आपला पुर्वजासले याद कराना दिन से .श्राद्ध पूजन हाई दोन परकार न से ज्याना माय किंवा बाप मरणात तो पहिला वर्षाले जे श्राद्ध घालतस तेले "डेरग पूजन "आस म्हणतास .जर एक वर्षापेक्षा जास्त दिन झायात तर तेले "घागर पूजन "अस म्हणतस .मडकामा पाणी भारीसन तेनावर लोटा ठेवतस त्या लोटावर सांजोरी ठेवतस व निवध ठीसनी पूजा करतस .चुला म्हा निवध ताकाथस तेले "आगारी"म्हणतस दुस रावाडना लगन व्हयेल मानुसले जेवाले बलावतस तेनी पूजाकरतस तेले "पित्तर "म्हंतस ."आखाजी स्री मुक्तिनी "जस जस उन्हायान उन पडस तस तस नवीन लग्न व्हयेल बाई ले माहेर न मुई येवणी वाट देखस .आखाजीले माहेर ले जाईसनी झोकावर बसीसन सासर ना सुख दुखना गाना म्हनस.आखाजी ना सन बाई साठे पूर्ण स्वतंत्र ना दिवस ऱ्हास.हसन खिंदळन,झोका वर बसन,गाना म्हणन .या सर्वा इच्छा पुऱ्या करणा दिवससासर ले सासू-सासरा,दिर,ननद.जेठ.यासना समोर ते स्वतंत्र भेटन शक्य नही म्हनिसन आखाजीले माहेर ले तो आनंद लेतस.गौराई उत्सव खानदेश मा सेसर्व पोरी एकत्र येथस गौराईन पाणी आणा साठे गाव जवळ ना आंबा ना झाड खाले जमा व्हतस .गौराई ना गाना म्हणतस .गाव मधून जातांना एक पोर ले माणूस ना कपडा घलतस पेंट,शर्ट ,गॉगल हातमा पुस्तक डोकावर छत्री धरेल ऱ्हास. तेले"मोगल "आस म्हणतस.."आखाजी स्वतंत्र ना दिवस "खान्देशम्हा आखाजी सर्वासले बंधन मुक्ती ना दिन .आखाजीले तरुण पासून ते म्हतारा पोरे सोरे सले पत्ता,जुगार.पैसा खेवाले पूर्ण मुभा ऱ्हास .आखाजीले शेतकरी सालदार लावस सालदारकी न साल पण आखाजीले ठरस .असा खान्देशना खान्देशी अखाजीना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा