फौज में मौज है;
हजार रूपये रोज है;
थोड़ा सा गम है;
इसके लिए भी रम है;
ज़िंदगी थोड़ी रिस्की है;
इसके लिए तो व्हिस्की है;
खानें के बाद फ्रुट है;
मरनें के बाद सैलूट है;
पहनने के लिए ड्रैस है;
ड्रैस में जरूरी प्रेस है;
सुवह-सुबह पी.टी है;
वॉर्निग के लिए सीटी है;
चलने के लिए रूट है;
पहनने के लिए D.M.S बूट है;
खाने के लिए रिफ्रैशमेंन्ट है;
गलती करो तो पनिशमेंट है;
जीते-जी टेंशन है;
मरने के बाद पेंशन है।
फौजी म्हणजे………
फौजी म्हणजे फीरता वारा
फौजी म्हणजे वाहता झरा।
फौजी म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा।।
फौजी अंगावरील शहारा
फौजी रात्रीचा पहारा।
फक्त फौजीच आहे
सुख अन दु:खाचा सहारा।।
फौजी जन हिताचा नारा
फौजी आहे अनमोल हिरा।
फौजी म्हणजे गुन्हेगारांचा
एक बापच आहे दुसरा।।
फौजी म्हणजे धाक दरारा
त्याचाच आहे वचक सारा।
काहीही करु शकतो पोलीस
जर असेल तो नितीनं खरा।।
फौजीवर प्रेम करुन पहा
एकदा तरी फौजीवर
प्रेम करुन पहा।
मनापासुन त्याच्यावर
तुम्ही मरुन पहा।।
जीवाला जीव देईल तुमच्या
त्याचा हात धरुन पहा।
त्याचं नाव काळजावर
एकदातरी कोरुन पहा।।
कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा।
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा।।
त्याच्या सारख्या यातना
एकदा तरी सोसुन पहा।
अनोळखी जगात तुम्ही
एकटे बसुन पहा।।
दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा।
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा।।
एकदा तरी फौजीवर
प्रेम करुन पहा।
तो रोज मरतो तुम्ही
एकदातरी मरुन पहा।।
लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा।
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
फौजीच्या यातना सोसुन पहा।।
एकदा तरी फौजीवर
तुम्ही प्रेम करुन पहा………
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा