अत्यंत महत्वाचे
आशीष कुमार एका खासगी कंपनीत मॅनेजर आहेत. आशीष एटीएममधून १० हजार रुपये काढण्यासाठी गेले. त्यांनी कार्ड स्वॅप करून पिन टाकला आणि १० हजाराची नोंद केली. त्यांच्या अकाऊंट मधुन पैसे कापले मात्र एटीएम मधुन पैसेच बाहेर आले नाहीत. त्यानंतर आशीष संबंधीत बँकेत गेला आणि आरबीआयच्या एटीएम ट्रान्झॅक्शनच्या गाईडलाईन प्रमाणे त्याने प्रक्रिया पूर्ण केली. बँकेने त्याला १०,८०० रुपये परत केले. म्हणजेच ८०० रुपये जास्त. जर अशाच परिस्थितीत तुम्हीही अडकलात तर बँके कडुन कशा प्रकारे भरपाई मिळवाल. माहित नाही ना.. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो, ७ सोप्या पध्दती....
सर्वात प्रथम आरबीआय एटीएम ट्रान्झॅक्शन गाईडलाईन समजून घेऊयात -
अ. आरबीआय गाईडलाईन प्रमाणे, अकाऊंटमधून पैसे कापले मात्र एटीएममधून तुम्हाला ते मिळाले नाही, अशा प्रसंगी ७ दिवसांच्या आत कार्यालयीन दिवस) बँक त्या ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये पैसे पुन्हा टाकेल. जर असे झाले नाही तर, पेमेंट आणि सेटेलमेंट सिस्टम अॅक्ट २००७ अंतर्गत बँक १००रुपये/दिवस या हिशोबाने नुकसान भरपाई देईल.
ब. ट्रांझॅक्शनच्या ३० दिवसांच्या आत तक्रार केल्यावरसुध्दा एटीएम धारकाला बँकेकडून भरपाई घेण्याचा हक्क आहे. यानंतर तक्रार केल्यानंतर बँकेला भरपाई देण्यास बंधन नसते.
१. एटीएम स्लीप अथवा अकाऊंट स्टेटमेंट संबंधीत बँकेच्या शाखेत तक्रार करावी.
एटीएम मशीनमध्येच संबंधीत शाखा आणि मॅनेजरचे नाव आणि क्रमांक लिहिलेला असतो.
२. ट्रॉझेक्शनच्या ३० दिवसांच्या आतच तुम्हाला तक्रार करायची आहे. तुमच्या एटीएम कार्डची संपूर्ण माहिती, अकाऊंट नंबर, एटीएम आयडी अथवा लोकेशन आणि ट्रॉझेक्शनची तारीख, वेळ इत्यादी माहिती बँकेला देणे आवश्यक आहे.
३. ब्रँट मॅनेजरकडून बँकेचा स्टॅम्प आणि स्वाक्षरी सोबत तक्रारीची परत पावती नक्की घ्या. ही प्रत १०० रुपये प्रती दिवस या भरपाईसाठी खुप महत्त्वाची आहे.
४. तक्रारीच्या तारखे पासून ७ दिवसांच्या आत पैसे न आल्यास एनेक्जर - 5 फॉर्म (http://rbidocs.rbi.org.in/rdocs/content/pdfs/170811AN_5.pdf) हा फॉर्म भरून मॅनेजरला द्या.
ज्या बँकेत तुमचे अकाऊंट आहे तेथेच हा फॉर्म जमा करायचा आहे.
५. बँक एनेक्जर-5 फॉर्म भरण्याच्या तारखे पासुनच पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये येई पर्यंत प्रती दिवस १०० रुपये या प्रमाणे भरपाई देईल. अकाऊंटमधून कापलेल्या पैशांसोबतच भरपाईची रक्कमसुध्दा तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात येते. असे समजून घ्या तुमच्या अकाऊंटमधून १० हजार रुपये कापले गेले, मात्र ते एटीएममधून बाहेर आले नाही. जर तुम्ही ५ एप्रिलला एनेक्जर-5 भरला आहे आणि पैसे २०एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये जमा झाले तर तुमच्या खात्यात ११,५०० रुपये येतील. यामध्ये १५ दिवसांचे १५०० रुपयांची भरपाई देण्यात येईल.
६. जर बँक पेनाल्टी देत नसेल तर आरबीआय च्या बँकींग ओम्बड्समॅनला https://secweb.rbi.org.in/BO/precompltindex.htm वर ऑनलाईन तक्रार करू शकता.
फोनवरूनसुध्दा तक्रार करू शकता. ओम्बड्समॅनचे नाव आणि दुरध्वनी क्र. जाणून घेण्यासाठी https://www.rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx?Id=164 वर जा...
७. तक्रारीच्या आधारे आरबीआय ओम्बड्समॅन संबंधीत बँकेकडे उत्तर मागेल.
बँकेकडून देण्यात आलेले उत्तर आणि सोबतचा पुरावा तपासला जाईल.
बँकेची चुक असल्यास बँकेला भरपाई देण्यास आरबीआय सांगेल.
बऱ्याच लोकांना ही माहिती नसते. कृपया इतर ग्रुप्सवर शेअर करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा