बुधवार, ४ मे, २०१६

श्री स्वामी माऊली

✍��
☄॥श्री स्वामी माऊली ॥

स्वामीकथा पडो श्रवणीं ।
नेत्र जडो स्वामीचरणीं ॥१॥
दिव्यगंधी हरपो भान ।
वाचे स्वामींचे गुणगान ॥२॥
स्वामीनाम श्वासोच्छ्वासी ।
छंद लागो अंतरासी ॥३॥
विश्व अवघे स्वामीमय ।
अमृतेसी तरणोपाय ॥४॥

॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ : या अभंगातून प. पू. श्री. गुरुमहाराज  यांनी, आपली भक्ती दृढ होण्यासाठी श्रीस्वामीभक्तांनी श्रीस्वामीमाउलीकडे काय मागावे? याचा आदर्शच घालून दिलेला आहे. हे जणू श्रीस्वामी संप्रदायाचे ' पसायदान'च  आहे.
या अभंगात ते श्रीस्वामींना विनवतात की, " हे स्वामीराया, माझे कान सदैव तुमच्याच लीलाकथा श्रवण करोत, माझे नेत्र सर्वत्र अखंड तुमचेच रूप पाहोत. तुमच्या शरीरातून सतत स्रवणा-या दिव्य सुगंधामध्ये माझे देहभान हरपून जावो. माझ्या वाचेने सतत तुमचेच गुणगान होवो. माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर तुमचेच नामस्मरण होवो. हेच सर्व छंद माझ्या अंत:करणाला सतत लागून राहोत. यच्चयावत् सर्व विश्व मला कायम श्रीस्वामीमयच दिसो. श्रीस्वामीराया, आपली अशी परमकृपाच माझ्यासाठी एकमात्र तरणोपाय आहे ! "
॥ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥
��������������������������������

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा