आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व
ज्ञानाची शक्ती शिष्याच्या क्षमतेपेक्षा भिन्न आहे. अशी ही शक्ती तडकाफडकी एकाच झटक्यात शिष्यात आली तर शिष्यासाठी ती घातक ठरू शकते. अशा वेळी गुरूंच्या शक्तीची आश्यकता भासते.
मला नेहमीच विचारले जाते की, वेद आणि योगशास्त्रावर आधारित पुस्तके किंवा ग्रंथ वाचून एखादी व्यक्ती आपली आत्मिक प्रगती का नाही करू शकत? आत्मिक प्रगतीसाठी गुरूचीच गरज का असते? लोक नेहमी म्हणतात की, ‘‘मी मला कुठल्याही दुस-या व्यक्तीसमोर झुकणे मान्य नाही’’ अशा या प्रश्नांनी व विचारांनी मला ‘गुरू’बाबत लिहावयास प्रेरित केले आहे.
‘गुरू म्हणजे काय’ हे समजून घेण्यासाठी अशी कल्पना करा की साधक म्हणजे एका थंडगार दगडासारखा आहे आणि परमज्ञान हे उकळत्या जलासमान आहे. हे असे उकळणारे जल आपण थेट एखाद्या थंडगार दगडावर ओतले तर त्या ज्ञानाच्या शक्तीने आणि तापमानाच्या परिवर्तनाने त्या दगडाला भेग पडू शकते किंवा तडा जाऊन तो दगड खंडित होऊ शकतो.
गुरू ती शक्ती आहे जी ज्ञानाला धारण करण्यात सक्षम असते व स्वत:च्या शक्तीने या ज्ञानाच्या तापाला शिष्याच्या स्तरावर आणू शकते.अर्थात थंडगार दगडावर उकळते जल ओतण्याऐवजी, त्या जलाचे तापमान सर्वप्रथम किंचित कमी करून मग थेंब थेंब करून हे जल त्या दगडावर सोडले जाते, जेणेकरून त्या दगडाला तडा न जाता याउलट त्या दगडाचे तापमान हळूहळू वाढू लागते आणि साधकपण त्या गरम जलाप्रमाणे तापू लागतो आणि स्वत: गुरुपदाला जाऊन पोहोचतो.
अर्थात ज्ञानाची शक्ती शिष्याच्या क्षमतेपेक्षा भिन्न आहे. अशी ही शक्ती तडकाफडकी एकाच झटक्यात शिष्यात आली तर शिष्यासाठी ती घातक ठरू शकते. अशा वेळी गुरूंच्या शक्तीची आश्यकता भासते. कारण ती ज्ञानाला धारण करण्यास सक्षम असते. गुरूंची शक्ती हळूहळू या तापाला शिष्याच्या क्षमतेनुसार त्याच्यात संचालित करते व यामुळे शेवटी साधक कोणत्याही हानीशिवाय ज्ञानाच्या या शक्तीला धारण करण्यास सक्षम बनतो.
परदेशातील एक प्रसिद्ध तांत्रिक ‘सर जॉनव्रूडोफे’ यांच्या रचना अतिशय स्तुत्य आहेत, खासकरून त्या रचना ज्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे ‘गुरू’ या विषयावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या काही विचारांचा मी पुढे उल्लेख करत आहे.
योग किंवा इतरत्र कोणत्याही साधनेचा मार्ग गुरूंशिवाय अवलंबणे शक्य नाही.
गुरू म्हणजे केवळ हे शरीर नसून परमगुरूंचे स्वरूप असतात, तेच अवतार घेऊन, मनुष्यरूप धारण करून योगच्या यात्रेच्या माध्यमाने आपले मार्गदर्शन करतात.
साधकासाठी गुरूच त्याच्या साधनेचा आधार असतात आणि त्याचे अंतिम लक्ष्य असतात. कारण असे म्हटले जाते की शिष्य हा फक्त जोवर साधक असतो तोवरच शिष्य असू शकतो, अर्थात जोपर्यंत गुरू शक्तिपातच्या माध्यमाने स्वत:च्या सा-या शक्तीचा संचार त्या शिष्यात करत नाहीत तोपर्यंत गुरू आणि शिष्यात भेद राहतो, म्हणजेच तोपर्यंत गुरू आणि शिष्यांचे अस्तित्व एकमेकांपासून भिन्न राहते. शक्तिपात किंवा दीक्षा मिळवून शिष्यसिद्धी प्राप्त करतो तेव्हा गुरू आणि शिष्य यांमधील द्वैतवाद सरतो आणि ते दोघे एक होऊन जातात.
मुंडमाला तंत्रात म्हटले गेले आहे की, सिद्धीचा आधार देवतामध्ये निहित आहे. देवाचे शरीर मंत्रात निहित असते आणि मंत्राचा आधार दीक्षा होय, तथा दीक्षेचा आधार गुरूआहेत. ज्याप्रमाणे जीवाची मुक्ती देवगुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय संभव नसते आणि देवतांच्या गुणांच्या आराधनेशिवाय त्या गुणांच्या पलीकडे जाणं संभव नाही, त्याचप्रमाणे गुरूंच्या आराधनेशिवाय परमज्ञानाची प्राप्ती होणे असंभव आहे.
एका साधकासाठी गुरूंच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरी कोणतीच शक्ती नसते. गुरूंचे स्थान सर्वात उच्च असते. शास्त्रांतसुद्धा अशी कुठलीही गोष्ट लिहिलेली नाही जी गुरूंच्या भक्तीपेक्षा श्रेष्ठ असेल. साधकाने स्वत:चे गुरू, त्यांच्याभोवतीचे सगळे वातावरण व त्यांच्याशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट सर्वात पवित्र आणि परम सत्य समजली पाहिजे.
इतकेच नव्हे तर गुरूंच्या निवासस्थानाला भगवान शिवाचे कैलाशस्थान मानले जाते, ज्या गृहात गुरुवास करतात त्या गृहाला चिंतामणी निवास मानले जाते. त्यांच्या घरातील वृक्ष कल्पवृक्ष असतात जे साधकाच्या सा-या इच्छा पूर्ण करण्यास समर्थ असतात, तिथे वाहणारे पाणी म्हणजे कलियुगाचा तीर्थ गंगा नदी होय. या सा-याचा मथितार्थ असा की, अशा या पवित्र स्थानी असलेले सर्व काही पवित्र असते.
हाच भाव ठेवून साधकाला गुरूंच्या प्रती पूर्णपणे समíपत झाले पाहिजे. रुद्रयामाला ग्रंथात असे म्हटले गेले आहे, जो मूर्ख स्वत:चे जप आणि तप गुरूंकडून प्राप्त करून घेण्याऐवजी पुस्तके वाचून करतो तो केवळ पापांचा साठा करतो, त्याला कुणीही वाचवू शकत नाही. केवळ गुरूच त्याच्या सा-या पापांना एका क्षणात नष्ट करू शकतात.
शास्त्रांमध्ये गुरूंच्या महानतेवर व महत्त्वावर खूप जोर दिला गेला आहे. आधीच्या युगांमध्ये गुरू-शिष्य परंपरेद्वारेच ज्ञान प्राप्त केले जायचे. कारण ज्ञान पुस्तके वाचून किंवा प्रवचने ऐकून आत्मसात करता येऊ शकत असते तर सा-या योगिक व तांत्रिक क्रियांमध्ये गुरूंना सर्वोच्च स्थान प्राप्त झाले नसते. याचमुळे हे गूढ विज्ञान आणि त्याचे सिद्धांत आजही अखंड आणि आपल्या वास्तविक स्वरूपात उपस्थित आहेत.
जिथे प्राचीन ग्रंथांच्या प्रमाणतेवर कोणताही पुरावा उपलब्ध नाही तिथे आजही पुरातन संतांच्या आणि ऋषी-मुनींच्या अनुभवांचा अनुभव करणे शक्य आहे. ज्या ज्ञानाचा आणि शक्तींचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला तो अनुभव घेणे आजही त्या साधकांसाठी शक्य आहे; ज्यांना गुरू कोण आहेत आणि काय आहेत याचा बोध झाला आहे व जे आपल्या गुरूंच्या प्रत्येक शब्दाला मंत्र समजून पूर्ण निष्ठेने आणि नेमाने पालन करतात. ज्यांची आत्मिक यात्रा गुरूमिळाल्यावर आरंभ होते, त्यांना सतत समíपत रीतीने अभ्यास करण्याची गरज असते, ज्यायोगे नियमित रूपात पालन करूनच या अभ्यासाचे योगच्या रूपात समापन होते.
☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा