आपण लग्नात (फ़क्त तांदूळ - अक्षता वापरतो...दूसरे कोणतेही धान्य नाही ) अक्षता वापरतो याची खालील दोन महत्वाची कारणे-
हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही...त्याला आतून कीड पडत नाही...म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते !
दूसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते...तेव्हा ते खरे बहरते.....! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे....पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते....यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी ....असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात....
आपल्या कड़च्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा