बुधवार, २ डिसेंबर, २०१५

भारत देश आपलाच आहे ना??

भारत देश आपलाच आहे ना??
आपण सारे भारतीयच आहोत ना??
मग कधी नव्हे ते सम्पूर्ण जगभरात आपल्या देशाच्या पंतप्रधानाचा गौरव होत असताना...

कायम आपल्या ऐश्वर्य सम्पन्न आयुष्यात मश्गुल असणारे व जगाशी देण घेणं नसलेले आखाती सुलतान आज भारताच्या पंतप्रधानांपुढे पायघड्या घालत असताना...

ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केले आज त्याच ब्रिटनचे पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानांच्या आदरतिथ्यासाठी मनापासून धडपडत असताना...

अत्यन्त बलाढ्य, घमेंडी व आत्मकेंद्री असलेल्या अमेरिका सारख्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना ज्यांची भुरळ पडते...

सम्पूर्ण जग ज्याच्यामुळे भारताला एशियाचे उभरते नेतृत्व मानू लागले आहे...

ज्याच्यामुळे अत्यन्त मुजोर अशा चिनी ड्रॅगनची झोप उडाली...

अशा देशाच्या पंतप्रधानाबद्दल आपल्या तोंडून दोन चांगले शब्द सुद्धा निघत नसतील तर एकतर आपले मानसिक संतुलन बिघडले आहे, अथवा आपला डीएनए पाकिस्तानी आहे, असेच म्हणावे लागेल...

तुम्ही कुठच्या देशाचे नागरिकत्व पत्करले मला माहिती नाही, परंतु माझ्या भारत देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहे याचा मला प्रचंड अभिमान वाटतो...

नरेंद्र मोदी हे कसेही का असेल, पण देश सोनिया-राहुल, नितीश-लालू, मुलायम, शरद पवार यांसारख्या अत्यन्त बेभरवशाच्या नेत्यांपेक्षा लाख पटीने सरस आहेत...

पण तुमचा मोदीद्वेष आता देशाची राज्यघटना, राष्ट्रीयत्व यापलीकडे गेला असून डोक्यातील नकारात्मकतेमुळे तुम्ही मनोरुग्ण बनत चालले आहात हे मात्र नक्की...

मोदींनी ब्रिटनमधील भाषणात शिक्षणासंबंधीचे 50 हुन अधिक apps बनविणाऱ्या अलवर येथील इम्रान खान नावाच्या शिक्षकाचे मोठ्या अभिमानाने कौतुक केले, पण ते आपल्याला दिसले नाही, कारण मोदींना शिव्या घालण्याच्या नादात मुळात आपणच किती असहिष्णू बनलो आहोत याचा आपल्याला विसर पडतो आहे...

ज्या फेसबुक व्हाट्स अप युजर्सकडे नेट पॅक आणि नीट पेग मारायला पैसे आहेत पण तूरडाळ विकत घ्यायला पैसे नाही अशा सर्व भिकारचोटांनी वरण खायला माझ्या घरी यावं, मी जाहीर आमंत्रण देतो...

शेतकऱ्याची अवलाद आहे ही...
आपला खिसा फाटका असला तरी काळीज वाघाचं आहे...
आज उपाशी असलो तरी हातात नांगर आहे, भिकेच वाडग नाही...
कपड्यांना ठिगळ लागली असली तरी पण इमान मात्र फाटलेल नाही...

- भारतीय नागरीक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा