||श्री राम समर्थ||
अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न - केशवा जर मृत्यू सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला. जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही.
श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल- पार्था मांजर जेव्हा उंदराला पकडते तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन दुसर्या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे, फक्त परीणाम वेगवेगळे आहेत.
तसेच मृत्यू एकच आहे पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल तर दुसरा ८४ योनींच्या फेर्यामध्ये अडकेल....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा