शनिच्या दारी क्रांती महिलांची!
एखाद्या व्यक्तीला त्याला आवडती कृती (ज्या कृती चा कोणताही त्रास समाजाला किंवा व्यक्तीला होणार नाही अशी कृती) करू देण्यापासून कोणत्याही कारणाने रोखणे ही मला गुलामी लादण्याची प्रथा वाटते, ज्या बंदीचे कोणतेही शास्त्रीय कारण तुम्ही देऊ शकत नाही अशी बंदी पाळत राहणे एक मानसिक गुलामी आहे. हे माणसा सारख्या सृजनशील आणि उत्क्रांतशील प्राण्यात आणि त्याच्या समाजात घडाव हे अगदी चमत्कारिक आहे आणि चीड़ आणनारे आहे.
या बाबत कोणतेही शंका नाही की धर्म ही पुरुषाची निर्मिती आहे, तो नैतिक आचरण एवढा मर्यादित असता तर महात्मा फुले सांगतात त्याप्रमाणे तो स्त्री व पुरुष दोघांना ही लागू आहे.पण आताचे सर्व धर्म आचाराना बाबत सर्वांना समान वागवतात का? तर याचे निसंशय उत्तर नाही असेच आहे.
काल शनिशिंगणापुर येथे एका तरुणीने चौथर्यावर चढून शनिला तेल वाहिल म्हणून मोठा बवाल जाला. याचे मला आश्चर्य वाटले. ही एक स्वाभाविक कृती होती. तीला स्त्री म्हणून जर चौथर्यावर चढ़ु दिले जात नसेल तर हा धर्माने तिच्या स्वातंर्यावर घातलेला घाला आहे अस मी मानतो.
मुस्लिम धर्म स्त्री गुलामीसाठी सर्वात आघाडीवर असेल अस मला वाटत. बुरखा,पोटगी आणि अनेक असे निर्बंध मुस्लिम तरुणींनी तोडले पाहिजेत. त्यांनी आपल्या मुक्ती साठी धाडस केले पाहिजे.
कोणताही धर्म जर व्यक्तिस्वातंत्र्य आड़ येत असेल तर असा धर्म न मानन्याचे धाडस केले पाहिजे. आणि हे सर्व धर्मातील स्त्रीयांनी कराव.
आणि निषेध करणाऱ्या लोकांनो....
दगडाचे शुद्धिकरण करण्याऐवजी मनाचे आणि विचारांचे शुद्धिकरण करा.
मंदीरमे आना मना है
तिच्या हातचं जेवण चालतं, लाड चालतो, मेहनत चालते, राखी चालते, तीचं मतदान चालतं, तीचं शरीर चालतं,
तीचा पगार चालतो, तीचा हूंडा चालतो,तीच्या बापाची प्रॉपर्टी चालते, तीची मेहनत चालते..असं तीचं सारं सारं चालतं..
फक्त ती मंदीरात चालत नाही...
जिच्या "उधरा" मधे नऊ महीने राहूनच आपण बाहेर येतो तिलाच
"अंदर प्रवेश निषिद्ध ? "
[11:08, 01/12/2015] Jyoti Shirshat Tina: आम्हीच बहिष्कार टाकतो तुमच्यावर...
प्रगती बाणखेले
सर्जनाचं ‘महाद्वार’ असलेल्या योनीला ‘नरकाचं द्वार’ ठरवून, मासिक पाळीच्या भीतीने स्त्रियांना मंदिरप्रवेश नाकारण्याचा संस्कृतीरक्षकांचा उद्योग वर्षानुवर्षं सुरू आहे. शबरीमला मंदिराच्या अध्यक्षांच्या ताज्या वक्तव्याने ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. परंतु आता परंपरेला शरण न जाता, ‘तुम्ही कोण नाकारणार, आता आम्हीच बहिष्कार टाकतो,’ अशी भूमिका तरुण मुलींनी घेतली आहे...
गेले काही दिवस विशी-पंचविशीतल्या मुलींनी भल्या-भल्यांची बोलती बंद केलीय- ‘हो, होतो आम्हाला दर महिन्याला रक्तस्राव आणि आम्ही खूश आहोत त्याबद्दल. म्हणणं काय आहे तुमचं?’ असा थेट प्रश्न विचारत सॅनिटरी नॅपकिन्स, योनीची चित्रं हातात घेऊन Happy to Bleed म्हणत मुली सेल्फी पोस्ट करताहेत. भारतातल्या या पोरींच्या धाडसाला जगभरातून प्रतिसाद मिळतोय, त्यांचं कौतुक होतंय.
याला निमित्त आहे शबरीमला देवस्थानाच्या अध्यक्षांच्या वक्तव्याचं. या मंदिरात १२ ते ५० वयोगटातल्या, म्हणजे जननक्षम वयातल्या बायकांना प्रवेश नाही. इथला कारभार बघणाऱ्या देवस्वम बोर्डावर नुकतीच अध्यक्ष म्हणून प्रयार गोपालकृष्णन यांची निवड झाली. महिलांच्या मंदिर प्रवेशाबद्दल त्यांना विचारलं तेव्हा, ‘अपवित्र (म्हणजे मासिक पाळी सुरू असलेली) स्त्री शोधणारं यंत्र येईल तेव्हा बघू,’ असं दिव्य उत्तर त्यांनी दिलं आणि ठिणगी पडली. स्त्रीत्वाचा, तिच्या जननक्षमतेचा अपमान करणाऱ्या या वक्तव्यावर संताप उमटला आणि तो कधी नव्हे एवढ्या तीव्रपणे व्यक्तही झाला. तोही कुणाच्या आवाहनाने नाही, तर स्वयंस्फूर्तपणे!
खरंतर शबरीमलाचं मंदिर हे बायकांना प्रवेश नाकारणारं एकमेव देवस्थान नाही. केरळातलंच पद्मनाभस्वामी मंदिराचं कोशगृह, दिल्लीच्या जामा माशिदीतले मिनार, मुंबईतला हाजीअलीचा दर्गा, पुष्करचं कार्तिकेय मंदिर, रणकपूरचं जैन मंदिर... ही यादी कितीही लांबवता येईल. याशिवाय बायकांना अमूक कपडे घालूनच प्रवेश, हे तर शेकडो ठिकाणी. नुकतीच त्यात काशी विश्वेश्वर मंदिराच्या साडीसक्तीची भर पडलीय!
मासिक पाळीच्या काळात बाई अपवित्र होते, हा समज शीख धर्म वगळता सर्व धर्मांत सारखा. (शीख धर्म पुरुष-स्त्री समान मानतो आणि मासिक पाळीच्या काळात स्त्री गुरुद्वारात जाऊ शकते.) मात्र, हिंदू धर्मात याबाबत दिसणारा परस्परविरोध चक्रावून टाकणारा. एकीकडे या काळात तिच्या धार्मिक आचारांवरच नव्हे तर रोजच्या व्यवहारांवरही अपमानास्पद बंधनं. पाळीमध्ये भयंकर अमंगल काहीतरी आहे, असे लहानपणापासूनचे संस्कार, तशी वागणूक. या विषयावर मोकळेपणाने तर सोडाच मोठ्याने बोलायलाही बंदी. दुसरीकडे बाई म्हणजे शक्तीचं रूप. तिच्या सृजनाचा सोहळा म्हणून गर्भाशयाचं प्रतीक असलेल्या घटाची स्थापना, नवरात्र वगैरे. एकीकडे शिव आणि शक्तीच्या एकत्र येण्यातून निर्मिती घडते म्हणत निसर्गाच्या आदिम तत्त्वाची पूजा बांधायची. दुसरीकडे घरात, बाहेर बाईचं दमन. जमेल तिथे अवहेलना.
शक्तिपूजेची प्रथाही जुनी. सतीनं यज्ञात उडी घेतल्यावर वेडापिसा झालेला शिव, सतीचं पार्थिव खांद्यावर घेऊन त्रिभुवनात हिंडू लागला. त्यावेळी तिच्या पार्थिवाचे तुकडे जिथे जिथे गळाले ती शक्तिपीठं. तिची योनी गळून पडली ते ठिकाण म्हणजे आसाममधलं कामाख्या मंदिर, असं मानतात. इथे देवीच्या मूर्तीची नव्हे तर योनीची पूजा होते. दर वर्षी आषाढात (आसामीत आहार) होणाऱ्या अंबूबाची या चार दिवसांच्या सोहळ्यात देश-विदेशातून दहा लाखांवर भाविक सहभागी होतात. कामाख्या देवी वर्षातून एकदा यावेळी रजस्वला होते, असं मानलं जातं. पेरणी सुरू होण्याआधीचा प्रतीकात्मक सृजन सोहळा असतो हा. देवीच्या योनीवर पांढरे वस्त्र लपेटून ठेवतात. चार दिवस मंदिराचा दरवाजा बंद असतो. त्यानंतर तो उघडतो तेव्हा देवीला स्नान घालून भाविकांना प्रसाद वाटला जातो. तो असतो अंगोदक आणि अंगवस्त्राचा. अंगोदक म्हणजे देवीचा रजस्राव आणि अंगवस्त्र म्हणजे देवीच्या रजस्रावाने लाल झालेले वस्त्र. अर्थात यासाठी कुंकू वापरतात.
शेकडो वर्षं ही परंपरा सुरू आहे. देवी जननी आहे, साहजिकच तिला गर्भाशय आहे, योनी आहे आणि ऋतुस्रावही आहे, हे सहजतेनं केवळ स्वीकारणारीच नव्हे, तर त्याचा सोहळा करणारी रजस्वला देवीची पूजा ही परंपरा हिंदूंची! आणि मासिक पाळीमुळे बाईला अपवित्र ठरवत तिला मंदिर प्रवेश नाकारणारी परंपराही हिंदू धर्मातलीच. बायकांच्या बाबतीत हा विरोधाभास ठायी ठायी दिसतो. पुरुषी व्यवस्थेला मजबूत करणाऱ्या गोष्टींसाठी धर्म हवा तसा वाकवायचा, पाप-पुण्याच्या, पवित्र्याच्या भूलभुलय्यात बायकांना अडकवायचं, त्याला महान परंपरेची लेबलं लावायची. हे धंदे बिनबोभाट वर्षानुवर्षं सुरू आहेत.
धार्मिक कार्य, पूजापाठ सोडाच, पण रोजच्या व्यवहारातही मासिक पाळी ही अत्यंत अमंगळ, गुप्त ठेवण्याजोगी, चारचौघात लाज आणणारी गोष्ट आहे, अशाच पद्धतीनं पाहिलं जातं. अजूनही सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिरातीतले रक्ताचे डाग निळे असतात. सॅनिटरी नॅपकिन्सचं पुडकं काळ्या पिशवीतून दिलं जातं. ग्रामीण भागात तर स्वच्छतेची सर्वाधिक गरज असलेल्या त्या चार दिवसांत अंघोळीलाच परवानगी नाही. त्यात स्वच्छ कपड्यांची वानवा. आरोग्याचे गंभीर प्रश्न त्यातून निर्माण होतात. अडाणी सोडा, पण शिकलेल्या बायकाही ‘प्रॉब्लेम’, ‘अडचण’ अशा शब्दांत पाळीबद्दल बोलणार. संस्कार आणि परंपरांचा पगडा एवढा दाट की एरव्ही पुरुषांच्या बरोबरीने स्थान हवे म्हणून आग्रह, पण पाळीबाबत टोकाचे जुनाट विचार. मुलीही अर्धवट ज्ञान, कानोकानी कळलेल्या गोष्टी ऐकत मोठ्या होतात. चक्र सुरू राहतं. लैंगिक शिक्षण दूरच, विज्ञानात पाळीबद्दल शिकवताना शिक्षकच कानकोंडे होतात, अशी अवस्था.
भारतातली महिला चळवळ अनेक बाबतीत आघाडीवर राहिली. महाराष्ट्राने तर देशाचं नेतृत्व केलं. पण महिलांच्या मंदिरप्रवेशाचा मुद्दा या चळवळीच्या प्राधान्यक्रमावर कधीच नव्हता आणि नाही. कदाचित या चळवळीचं नेतृत्व उच्चवर्णीय, उच्च मध्यमवर्गीय महिलांकडे होतं म्हणून असेल किंवा त्यातल्या बहुसंख्य देव-धर्म नाकारणाऱ्या होत्या म्हणून असेल, पण हे घडलं. आता बहुजन समाजातल्या बायका राजकारणात, चळवळीत येऊ लागल्या, अन्यायाबद्दल बोलू लागल्या तेव्हा किमान या गोष्टींची चर्चा तरी सुरू झाली. अद्यापही यासाठी संघटितपणे आवाज उठवला जातोय, असं दिसत नाही.
मात्र, बदलत्या काळात तरुण मुलींना परंपरा आणि विज्ञानातला विरोधाभास कळू लागलाय. व्यवस्थेला जाहीरपणे प्रश्न विचारण्याइतक्या, आव्हान देण्याइतक्या त्या धीट आहेत. कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांच्या सोबत मूठभर का होईना, त्यांचे पुरुष साथी आहेत. गर्भगृहात प्रवेश नाही म्हणून अगतिकपणे टाचा उंचावून सभामंडपातून तरी देवाचं दर्शन घडावं म्हणून धडपडणाऱ्या बायकांचं चित्र बदलेल यापुढे. अपवित्रतेच्या नावाखाली बायकांना नाकारणाऱ्या पुरुषप्रधान धर्मसत्तेला आता मुलीच नाकारतील.
‘प्रवेश नाकारणारे तुम्ही कोण? आम्हीच बहिष्कार टाकतोय तुमच्यावर. तोंडाला कुलूप लावून बसलेल्या व्यवस्थेवर...’ हा आवाज पावित्र्याच्या कडी-कुलुपात घट्ट कोंडलेल्या देवाच्या कानी पडायची शक्यता नाहीच, पण त्याला असा कोंडून ठेवलेल्या ठेकेदारांच्या कानावर तो वेळीच पडला तर बरंय!
हे तर केवळ अवशेष...!
एकीकडे स्त्रीत्वाचा सन्मान, तिचं उदात्तीकरण आणि दुसरीकडे तिचा अवमान, अवहेलना या संस्कृतीमधील गोंधळाबद्दल लोकपरंपरेच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर सांगतात- स्त्रीच्या जननक्षमतेविषयी पुरुषांमध्ये एकाचवेळी आकर्षण असतं आणि दुसरीकडे भय, असूया. यातूनच मुलगी वयात आल्यावर मखरात बसवणं, लग्नातला गर्भदान विधी, गर्भारपणातले सोहळे, अपत्य जन्माचे कौतुक हे सारं आलं. पण हे सारं विवाहित महिलांच्या वाट्याला येतं, यातूनही स्त्रीच्या आडून पितृत्व मिरवण्याचा, पितृत्वाच्या सत्काराचा हेतू स्पष्ट दिसतो. मातृसत्ताक पद्धतीत पुरुष जोडीदार निवडीचे, बदलाचे हक्क स्त्रीला होते. त्यामुळेच कोणत्याही आदिम देवतेच्या शेजारी तिचा पुरुष जोडीदार दिसत नाही. ती स्वतंत्र, एकटी असते. जोडीदार मंदिराच्या परिसरात किंवा तिथून काही अंतरावर असतो. यासाठी आपल्या साडेतीन पिठांचं उदाहरण घेता येईल. जोवर स्त्रीप्रधान आचार होते, तोवर लैंगिकतेचा उपभोग घेणारी स्त्री होती. रजस्वला देवतेचे पूजन त्या काळातले. पुरुष आचार प्राधान्य आल्यानंतर देवतांच्या उपासना पद्धतीतही बदल झाले. मात्र संस्कृतीच्या प्रवाहात कोणतीही गोष्ट पुरती नष्ट होत नाही. ती कोणत्या ना कोणत्या रूपात टिकून राहते. शक्तिपूजा आजही अस्तित्वात आहे ती त्यामुळे. तांत्रिकांच्या वामाचारी पंथांमध्ये ती अधिक प्रमाणात दिसते. पूर्वी आदिम देवतांच्या सेविकाही आदिम समाजातल्या किंवा निम्न वर्गातल्या असत. काळाच्या ओघात या मंदिरांकडे उत्पन्नाचा ओघ वाढू लागला, तसतसा या देवस्थानांवर उच्चवर्णीयांनी ताबा मिळवला...सोबत त्यांचे पुरुषप्राधान्यही आले. प्रवेश मिळताच त्यांनी प्रथम साऱ्या जुन्या खाणाखुणा पुसल्या आणि स्त्रीपूजा केवळ अवशेष रूपाने राहिली!
http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/ardhiduniya/entry/happy-to-bleed
[11:09, 01/12/2015] Jyoti Shirshat Tina: मि एक नास्तिक ...
अस्तिक स्त्रियांनी मंदिरांवर बहिष्कार करावा !!!!
एका महिलेने शनिशिंगणापूर मंदिरात प्रवेश केला व त्यावरून गदारोळ माजला.
बाई मंदीरात पोचलीच कशी, म्हणून सात सुरक्षारक्षक निलंबित झाले.
मूर्तीला दुधाने धुण्यात आले . निषेध रैली काढण्यात आली. वास्तविक, बाई मंदीरात आली म्हणुन देवानेच त्या बाईला मंदीरात भस्मसात करुन टाकायला हवी होती. पण तसं झालं नाही. पुढेही देव त्या बाईचं काही वाकडं करेल, याची सूतराम शक्यता नाही, याची सनातनी धर्ममालकांना खात्री आहे
. शनिशिंगणापूरसारखा देवांचा बाजार भीतीवर, दहशतीवर उभा आहे. बाई त्या दहशतीवरच जाऊन उभी राहिली, त्यामुळे देवाच्या नावाने चाललेल्या त्या दुकानाचं अस्तित्वच धोक्यात आलंय.
गदारोळाने ते अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरु आहे. हळुहळू एका पाठोपाठ एक सगळ्याच दुकानांची दहशत संपत गेली तर करोडोंच्या उलाढालीचं काय ???? प्रश्न केवळ धार्मिक पाया उद्ध्वस्त होण्याचा नाही, तर त्या पायावर उभ्या राहिलेल्या जातीयवादी राजकारणाचाही आहे. निषेध रैली ही राजकीय मेंदूतूनच आलेली कल्पना. ज्यांना समाज मागे न्यायचाय, ते या संधीचा फायदा स्त्रियांना दुय्यम ठरवणारी सनातनी मानसिकता पुन्हा नव्याने घट्ट करण्यासाठी घेताहेत. पण खरंतर आधुनिकतेशी नातं सांगणाऱ्या मंदिरात जाणार्या समस्त महिलांनी या घटनेचा निषेध प्रार्थनास्थळांवर बहिष्कार करुन करायला हवा...
बाईच्या स्पर्शाचा विटाळ होतो, म्हणून लोक गाईच्या दुधाचा अभिषेक करणार असतील,
तर यात आईच्या दुधाशी केलेली बेईमानी स्पष्ट दिसते. या बेईमानीचा बदला समस्त घार्मिक स्रि वर्गाने घ्यायलाच हवा.
मंदिर मशिदी दर्गे जिथे जिथे स्त्रियांना प्रवेशबंदी , दर्शनबंदी आहे, तिथला प्रवेश स्त्रियांनीच झिडकारायला हवा व आपल्या ऊतरातुन जन्म घेवुन जग पाहनार्या आपल्या सोबती पुरुषास ही मंदीरात जाण्यास मज्जाव करावा.
!!! स्त्रियांना कस्पट समजणारी मनोवृत्ती शनिशिंगनापुर प्रकरनातुन चव्हाट्यावर आली
स्त्रियांच्या शोषणाची मूळं धर्मस्थळातच लपलेली आहेत. ती तिथूनच उखडायला हवीत. ही सरजाम शाही संपुष्टात यायला हवी....
देव दर्शनासाठी महिला निषिद्ध. .
शनीदेवाच्या दर्शनाला महिला, शनीशिंगणापुरात ग्रामस्थ संतप्त..
यानंतर शनीच्या चौथऱ्यावर शुद्धीकरणासाठी ग्रामस्थांकडून दुग्धाभिषेक देखील करण्यात आला. तसेच गावकऱ्यांकडून महिलेच्या दर्शनाचा निषेध करण्यात आला.
काल शनि शिंगनापुर मध्ये एका महिलेने धाडस दाखवून चौथऱ्यावर चढून दर्शन घेतले. त्याचा परीणाम म्हणजे मंदिर प्रशासनाने 8 सुरक्षा रक्षकांना निलंबित केले. त्याच बरोबर गावक-यांनी बंद ची हाक दिली. दुकानदारानी दुकाने बंद केली. मंदिर प्रशासन आणि ब्राम्हण मंडळींनी दुग्धाभिशेक करून शुद्धिकरण केले.
महाराष्ट्र सरकारने यावर अजूनही आपलं अधिक्रुत मत प्रदर्शित केलं नाही.
त्या महिलेच सर्व स्तरातून सत्कार आणि अभिनंदन व्हायला हवं.
सरकारने त्या महिलेस संरक्षण देणे आवश्यक आहे.
कारण तिचा घातपात घडवून आणला जावू शकतो आणि तिने धार्मिक मर्यादा तोडली म्हणून देवानेच तिला अशी शिक्षा दिली अशी आवई उठवली जावू शकते.
आज या महिलेच्या या धाडसाबद्दल तिच्या मागे कोण कोण उभे राहणार आहे हे पाहणे आवश्यक आहे. विशेषतः किती महिला तिचं समर्थन करण्यास पुढे येतात हे पहायला हवं.
तिनं केलेली सुरवात पुढे महिला चालवत राहतील का ?
_____________________
आपणही हीच बाजू समोर मांडतो आहोत. एक महिला चौथर्यावर जावून सुद्धा काही झाले नाही म्हणजे हे सारे थोतांड हे हे आपोआप सिद्ध होत असताना आपण गप्प राहणे म्हणजे मनुवाद्यांना मदत करणेच होईल..
कमाल आहे राव !
एका स्त्रीने (मादी )शनि मूर्तिला हात लावला म्हणून ती अपवित्र झाली.
पण तीच मूर्ति गोमाताच्या (मादी) मूत्राने शुद्ध होते.
ही काय भानगड आहे.
"पाळितील मंदिरप्रवेश"
अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानातील शनी चौथऱ्यावर महिलांना जाण्यास बंदी असतानाही पुण्यातील एका महिलेने चौथाऱ्यावर जात शनीचे दर्शन घेतले.यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.काहींनी या घटनेचे स्वागत केले आहे तर शनि शिंगणापूर ग्रामस्थ तसेच हिंदुत्वाच्या तथाकथित रक्षक संघटनांनी यास विरोध केला आहे.महिलेने चौथऱ्यापर्यंत प्रवेश केल्याने ग्रामस्थांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.महिलेने परंपरा मोडून थेट चौथऱ्यावर प्रवेश केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या शनि शिंगणापूर देवस्थान कमिटीने मंदिराच्या सात सुरक्षा रक्षकांना निलंबित केले आहे. महिलेने चौथऱ्यावर प्रवेश करून शनिदेवाचे पावित्र्य भंग केल्याच्या कारणावरून शनि शिंगणापूर गावात बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते परंतु त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत अग्रेसर समजाला गेलेल्या महाराष्ट्रात अनेक हिंदू मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही. स्त्रियांच्या हक्काबाबत जेथे मोठी जागृती आहे अशा महाराष्ट्रातील स्त्रियांना या भेद्भावाबाबत बंड करावेसे वाटत नाही.ही अत्यंत खेदाची बाब आहे.शनि शिंगणापूर मध्ये एका महिलेने ब्राह्मणवादी पुरुषी मानसिकतेविरुद्ध बंड करून जे धाडस दाखविले आहे त्याबद्दल या अज्ञात स्त्रीचे अभिनंदन केलेच पाहिजे.
महिलांना मंदिरांच्या किंवा पूजास्थानाच्या आत प्रवेश करू न देण्याची प्रथा भारतातील अनेक मंदिरामध्ये पाळली जाते.याचे कारण ब्राह्मणी धर्माने स्त्रीला पापयोनी, अपवित्र मानले हे आहे.स्त्रियांच्या प्रवेशामुळे देव बाटतो कारण ती अपवित्र असते ही धारणा हजारो वर्षापासून या देशात रुजली आहे. ज्या स्त्रीच्या उदरातून आपण जन्म घेतो, जिच्यामुळे आपले अस्तित्व निर्माण होते अशा स्त्रीला हीन,अपवित्र लेखण्याची अमानवीय लेखण्याची परंपरा असलेला हा देश फारच सहिष्णू असल्याचे जेव्हा हेच तथाकथित संस्कृती रक्षक सांगतात तेव्हा त्यांची कीव आल्याशिवाय राहत नाही. एकीकडे स्त्रीला महान म्हणून संबोधायचे तर दुसरीकडे स्त्रीत्वाचा घोर अपमान करायचा हा विरोधाभास या देशात शतकानुशतके चालत आलेला आहे. केरळमधील साबरीमाला देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांनी नुकतेच यासंदर्भात केलेले वक्तव्य संपूर्ण स्त्री वर्गाचा घोर अपमान करणारे आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार,"स्त्री मासिक पाळीमध्ये आहे किंवा नाही हे दाखवून देणाऱ्या यंत्राचा जेव्हा शोध लागेल तेव्हा स्त्रियांना साबरीमाला मंदिरात प्रवेश देण्याचा विचार करता येईल " गोपालकृष्णन यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून पंजाब मधील पतियाळा येथील निकिता आझाद या युवतीने गोपालकृष्णन यांना एक खुले पत्र लिहून सामाजिक माध्यमातून " हैप्पी टू ब्लीड " ही मोहीम सुरु केली. तिच्या या मोहिमेला संपूर्ण भारतभारातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे.ब्राह्मणी समाजव्यवस्थेने स्त्रियांच्या बाबतीत हा जो भेदभाव चालविला आहे तो कोणत्याही विवेकी माणसाला अस्वस्थ करणारा आहे.मात्र ब्राह्मणी समाजव्यवस्थेतील स्त्रिया मात्र या भेदभावाविरुद्ध सार्वत्रिक बंड करायला तयार होत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. ब्राह्मणी धर्मात या प्रकारच्या अशा असंख्य वाईट रूढी आणि चालीरीती प्रचलित आहेत त्याचा दोष केवळ एकट्या पुरुष वर्गावर टाकून स्त्रियांना मोकळे होता येणार नाही.या अनिष्ट रूढी सुरु ठेवण्यास स्त्रियाही तेवढ्याच जबाबदार आहेत.स्त्रियांच्या मासिक पाळीवरून स्त्रियांचा घोर अपमान करणाऱ्या प्रयार गोपालकृष्णन यांचा निषेध करण्यासठी त्यांच्याच राज्यातील कोणतीही स्त्री पुढे आली नाही. स्वतःला स्त्रियांच्या चळवळीच्या अग्रणी म्हणविणाऱ्या स्त्रीवादी पुढारी स्त्रिया या संदर्भात गप्प होत्या. महिलांच्या हक्कासाठी म्हणून कार्य करणाऱ्या राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील महिला आयोगासारख्या संस्था, एरवी संस्कृतीचा फारच गर्व वाटणाऱ्या महिला संघटना यांना प्रयार गोपालकृष्णन यांनी स्त्रीवार्गाबाबत केलेल्या या निंदनीय वक्तव्याचे काहीच वाटले नाही.शेवटी निकिता आझाद या केवळ २० वर्षाच्या युवतीने धाडसाने प्रयार गोपालकृष्णन यांना त्यांच्या वक्तव्याचा जाब विचारला याचे कारण म्हणजे या युवतीवर हिंदू धर्माविरुद्ध बंड करणाऱ्या गुरु नानक आणि संत रविदास या महापुरुषांच्या विचाराचे झालेले संस्कार हेच म्हणावे लागेल. निकिता आझाद हिच्या या प्रकरणातील पुढाकारवरून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते,ती म्हणजे ब्राह्मणवादी उच्च जातीय हिंदू स्त्रियांनी स्त्रियांच्या मुक्तीचा कितीही राग आळवला तरी ब्राह्मणी धर्मातील भेदभावपूर्ण रूढी आणि परंपरांना आव्हान देण्याची हिम्मत उच्च जातीय हिंदू स्त्रियांमध्ये अभावानेच दिसते.
स्त्रियांना मंदिरात किंवा मंदिराच्या गाभाऱ्यात,पुजास्थानाच्या आत प्रवेश करू न देण्याबाबतची कारणे वेगवेगळी सांगण्यात येत असली तरी मुख्य कारण म्हणजे महिला मासिक पाळीच्या काळात अपवित्र असतात त्यामुळे अशा अपवित्र महिलांना मंदिरात प्रवेश दिल्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग पावते हा हिंदूमध्ये असलेला समज हे मंदिरात स्त्रियांना प्रवेश न देण्याचे मुख्य कारण आहे. महिलांची मासिक पाळी हा विषय भारतीय समाजात खुलेपणाने चर्चा न करण्याचा विषय आहे.स्त्रियांच्या प्रजनन आरोग्याशी संबंधित या महत्वपूर्ण वैज्ञानिक बाबीविषयी सरकारी स्तरावरून आणि सामाजिक स्तरावरून म्हणावी तशी जागृती अद्याप तरी झालेली नाही.यामुळे मासिक पाळी सुरु असलेल्या स्त्रीला भारतीय समाजात अजूनही भेदभावपूर्ण वागणूक देण्यात येते.केवळ मादिरात प्रवेशच नव्हे तर मासिक पाळी आलेल्या स्त्रीला स्वयंपाक घरात प्रवेश करू दिला जात नाही. स्वयंपाकाच्या भांड्यांना हात लाऊ दिला जात नाही.अशा महिलांनी लोणच्याला स्पर्श केल्यास लोणचे नसते, दुधाला स्पर्श केल्यास दुध फाटते,झाडांना अथवा रोपट्यांना पाणी दिल्यास झाडे मरतात अशा प्रकारचे अनेक गैरसमज स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधाने समाजात प्रचलित आहेत. यामुळे मासिक पाळी आलेल्या स्त्रीला वेगळ्या जागेत एकटे ठेवण्याची प्रथा बहुसंख्य भारतीय कुटुंबांमध्ये प्रचलित आहे. महारष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील माडिया या आदिवासी जमातीमध्ये मासिक पाळी आलेल्या स्त्री/मुलीला गावाच्या बाहेर जंगलाला लागून असलेल्या झोपडीमध्ये एकटे ठेवले जाते. या प्रथेला 'गावकोर' असे नाव आहे.या प्रथेमुळे गावाबाहेरील झोपडीमध्ये एकटे असलेल्या महिला अथवा मुलीला अनेकदा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात किंवा विषारी सापाचा दंश होऊन त्या मृत्यमुखी पडल्याची उदाहरणे आहेत. मासिक पाळी हा स्त्रियांच्या प्रजननक्षम आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्वाची जैविक क्रिया आहे. मात्र यावर खुलेपणाने बोलणे निषिद्ध मानले गेल्यामुळे या काळात आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबाबत महिलांना आणि विशेषतः पौगंडावास्थेतील मुलीना काहीही माहिती नसते. ए.सी.निल्सन या संस्थेने केलेल्या पाहणीच्या अहवालानुसार भारतमध्ये केवळ १० टक्के स्त्रिया मासिक पाळीच्या काळात सेनीटरी पॅडचा वापर करतात. उर्वरित महिला घरातील जुने फाटके कपडे, किंवा आरोग्यास घातक अन्य प्रकारच्या वस्तूंचा वापर रक्तस्त्राव शोषण्यासाठी वापरतात.अलीकडे ग्रामीण भागात सुती कपड्यांचा वापर कमीतकमी होत असल्यामुळे चांगल्या प्रकारची शोषण क्षमता असलेल्या चिंध्या महिलांना मिळत नाही.म्हणून कधीकधी लाकडी भुसा भरलेल्या पिशव्या, वाळू,राख इत्यादी पदार्थांचा वापर स्त्रिया करतात असे आढळून आले आहे.यामुळे त्यांना गंभीर आजारांना बळी पडावे लागते.मासिक पाळीच्या काळात सेनीटरी पॅडचा वापर न करण्याचे महत्वाचे कारण या पॅडस बऱ्यापैकी महाग असल्यामुळे गरीब स्त्रिया अथवा मुलीना त्या विकत घेणे परवडू शकत नाही हे आहे. ही बाब लक्षात घेता गरीबातील गरीब स्त्रिया आणि मुलीना परवडतील अशा स्वस्त पॅडस उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे.यासाठी सर्वांनी एकमुखाने आवाज उठविला पाहिजे.
स्त्रियांना मासिक पाळीच्या कारणावरून अपवित्र मानाने व तिच्याशी भेदभाव करणे ही पुरुषी मानसिकतेतून उद्भवलेली एक प्रकारची विकृती आहे. स्त्रीला हिंदू संस्कृतीने यथायोग्य सन्मान दिल्याच्या बाता प्रधानमंत्र्यांपासून ते गल्लीतील साधू संतांपर्यंत अनेकजण करतात परंतु वास्तविक पातळीवर मात्र दांभिक वर्तन करताना दिसतात.परवाच संसदेतील संविधान दिनानिमित्ताच्या चर्चेत प्रधान मंत्र्यांनी स्त्रियांच्या सन्मानाचे श्लोक उद्धृत करून स्त्रियांना आपण कसे समतेने वागवितो याचा पाढा वाचला. मात्र त्यांच्याच सरकारने स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीत मुख्यतः शेतजमिनीमध्ये समान वाटा देणारा २००५ मध्ये करण्यात आलेला सुधारणा कायदा रद्द केला आहे. एकीकडे स्त्रियांच्या महानतेचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे स्त्रियांच्या अधिकारावर बंधने आणायची हे ब्राह्मणी संस्कृतीचे पारंपारिक लक्षण आहे. या संस्कृतीचा धिक्कार करण्याची हिम्मत भारतातील स्त्रिया जोपर्यंत दाखवीत नाहीत तोपर्यंत त्यांना मंदिरात प्रवेश न देणे,संपत्तीत समान वाटा न देणे, विविध कारणावरून त्यांच्यावर अपात्रता लादणे हे प्रकार घडत राहणार आहेत.
=====≠=================
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
ती एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं
अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते
एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते
पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं…………
salute 2 all womens
-------------
कशाला गेलीस बाई त्या मंदिरात. .
बाई आहेस तू
बाईसारख रहायच,
जग बदललं , विज्ञानाने प्रगती केली
गेलीस तू अंतराळात
पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून. ..
गाठलास तू तळ त्या अथांग सागराचा
न्यायालयात न्यायदान तर
पोलीस दलात योगदान.
झालीस तू मोठ्या वित्त कंपनीची CEO.
झालीस राष्ट्रपती, पंतप्रधान अन्
दाखवलस आपल्या राजकीय शक्तीच विराट रूप...
अन् दुसरीकडे
दारुड्या नव-याचा मार सहन करत
लेकरांच्या भल्यासाठी ओढतियेस
संसाराचा गाडा ....
रस्त्यावरची खडी फोडताना
झाडाला बांधलेल्या झोळी बरोबर
तुझाही जीव टांगलेला असतो.
घरी गेल्यावर नवऱ्याला मिळते
मोकळीक. पण तू. ...
चूलीला जाळ घालताना झालेल्या
धूराने डोळे जातात भरून पण
कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी निमूट सहन करतेस
विना तक्रार. ..
व्यवस्थेच्या अन्यायी बेड्या तोडून
स्त्री शिक्षिका झालीस तू...
वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला तू...
शेती पिकवून कृषी कन्या झालीस तू
शास्त्रज्ञ होवून शोध लावलेस तू
रणांगणात लढलीस तू
संकटांना भिडलीस तू.
तरीही
तूझ्या अफाट शक्ती बद्दल अनभिज्ञ राहिलीस तू...
सांग ना षूरूषांनी वाहीला असता का
नऊ महिने मातृत्वाचा भार.?
केली असती का आई वडील सोडून
सासू सास-याची सेवा. ..
काढली असती का लहान मुलांची
दुखणी खुपणी
खाल्ला असता का मार पिवून आलेल्या बायकोचा...
नाही ना. .?
स्त्रीशक्ती आपल्याला डोईजड होईल
हे ओळखून व्यवस्था जागी झाली
आणि मग तिने निर्माण केले नवीन
नियम. .....स्त्रियांसाठी.
तिने घर सांभाळायचे,
पतीला परमेश्वर मानायचे,
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही ,
शिक्षण घ्यायचे नाही ,
पुनर्विवाह करायचा नाही ,
केशवपन करायच,
घरात महत्वाचे निर्णय घ्यायचे नाही(अक्कल चालवायची नाही )
तूझ्या संघर्षातून कही बेड्या निखळल्याही असतील पण
काही तशाच राहील्या. ...
अन् तू खुशाल ती बेडी तोडायचं
धाडस केलस...
पुरुषांबरोबर स्त्रियांच्याही राशीला
येतो म्हणे तो. ..
मग पुरूष जवळ आलेले चालतात त्याला
मग स्त्रियांचाच का विटाळ होतो.?
म्हणून म्हणतेय कशाला गेलीस बाई त्या मंदिरात. ..?
स्त्रियांना निषिद्ध असणाऱ्या मंदिरांचा तूच निषेध कर...
नको टाकूस पाऊल तिथे
जिथे तुझं माणूसपण नाकारलं जातय.
अशा दगडांच्या देवाजवळ जाण्यासाठी भांडण्या पेक्षा
दीनदूबळ्यांमध्ये देव शोध.
आदिवास्यांचे प्रश्न, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न, भूकबळींचे प्रश्न, स्त्रीभ्रूण हत्त्येचा प्रश्न, पर्यावरण -हासाचा प्रश्न
असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी तुझी शक्ती खर्ची घाल.
कर मात सर्व संकटांवर
अन्
त्या माणूसघाण संस्कृतीवर!
हो!!
त्या माणूसघाण संस्कृतीवर!!!
एक महिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा