दोन वर्षां पुर्वी शेती हे नावच सोशल मिडीया वरती वाचायला मिळत नव्हते, कारण आमच्या पोरांना शेती व माती बद्दल बोलायला लाज वाटत होती. मग आपली पोर काय करायची, तर नट नट्या चे फोटो शेरो शायरि किंवा एखाद्या पुढार्याचा उदोउदो हीच कालची शेतकर्यांची फुकटची पाटिलकी होती.
परंतु आता काळ बदललाय... कधी नव्हे एवढी जागरुकता आमच्या पोरांत आली. आता हजारो पेजस झळकु लागलेत. "शेती आणि माती" शिवाय पर्याय नाही या बद्दल आता बोलु लागली.
आज बोलताहेत, उद्या रस्त्या वर येतील आणि परवा एक क्रांती घडवतील.... यात शंका नाही. मिञानो लक्षात ठेवा, भविष्यकाळ शेतकर्याँचाच आहे. गरज आहे स्वताला बदलत्या काळा बरोबर चालण्याची... सत्ताकारण्यांशी झगडण्याची.... पन्नास एकर चे मालक आज दोन एकर वरती आलेत... उद्या एक एकर वरती येतील... खाणारि पोट वाढली तसा जमिनी चा आकार घटत चाललाय. येत्या काळात लोक तुमच्या घरि धान्य मागायला घरोघर फिरतील तेँव्हा खर्या अर्थाने तुम्हि राजे असाल. हि कल्पना नाहि वास्तव आहे. आपण फक्त एकच करायचय शेती माती च विग्यान व व्यापारि मनोवृती आत्मसात करायचीय. आपल्या समोर खरे अाव्हान असणार आहे ते शिल्लक जमिन वाचवीण्याची व स्वताची मानसिकता बदलण्याची.... जुनाट रुढी परंपरा मोडा, अधिकाधीक विग्यानवादी बना... अंधश्रध्दा, भेदभाव, जातीयता, न्युनगंड, लाज, चीँता, देवभोळेपणा सोडा.... धुमधडाक्यातील लग्न, हुंड्या सारखी कुप्रथा आहे... त्यात समाधानी मातीत मिळवीणारे गावकारण व गावराजकारण, भावबंदकी चे खुणी डाव याला तिलांजली द्या आणि फक्त शेती हाच कर्म धर्म अंगीकारा.... बघा काय बदल घडतो ते लक्षात ठेवा, आपण शेती वर आई सारखे प्रेम केले तर आई सारखीच माया मिळेल. शेतीला ओझं समजालं तर काळा च्या ओझ्याखाली दबुन जाल. एकमेकांच्या हातात हात घालुन चाला, एकमेकांना अनुभव शिदोरि वाटत चला.... जग तुमचेच आहे. आपल्या मुलांना शेतीत जरुर आणा परंतु आगोदर त्याला शेतीच पुर्ण शिक्षण द्या. स्वत: मार्गदर्शक बना... आपले जुनाट विचार त्याच्या वरती लादु नका. माझ्या वयोवृध्द माता पित्यानो, आपण आपल्या पोरां वरती विश्वास ठेवा... त्याना कामाचे नियोजन करु द्या... कारण क्रांती नविन रक्तच करु शकते. बुढा शेर कभी शिकार नहि करता सिर्फ अपना रौब जमाता है....
पुन्हा एकदा सांगतो भविष्यकाळ शेती व मातीचा आहे मातीत राबणार्या बळीराजा चाच आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा