एका ब्राम्हणाने पत्नीला विचारले...
" पाणी छान आणि थंड आहे.
आपल्या घरात फ्रिज नाही,
कुठुन आणलेस..?"
पत्नीः-
"शेजारच्या कुंभारा कडुन.!"
ब्राम्हण ः- काय..?
त्या शुद्राचे पाणी मला पाजलेस, तुला लाज वाटत नाही...? आपण ब्राम्हण आहोत...
आपल्याला शुद्राचे
काही चालत नाही..?"
पत्नीः- (घाबरली व म्हणाली)
" मला माफ करा,
या पुढे अशी चुक
होणार नाही....
[दुस-या दिवशी.]
ब्राम्हण ः-
"अग...
जेवायला वाढ..!"
पत्नीः
"काही-नाही..!"
ब्राम्हण ः-
"काय...?
पोळी केली नाही..?"
पत्नीः-
" नाही....!
कारण...
तवा व चुल शुद्र लोहाराने
व चुल कुंभाराने बनवलेली असल्याने मी त्या वस्तू
फेकून दिल्या..!"
ब्राम्हण ः- "वेडी आहेस काय..?
बरं दुध आण..!"
पत्नीः-
"मी दुध फेकुन दिले
कारण....
ते शुद्र कुणब्याने दिले.
मी म्हटले
'उद्या पासुन दुध आणू नकाे'
आम्हांला शुद्रांचे
काही चालत नाही..!"
ब्राम्हण ः (किंचाळला)
" काय...?"
ब्राम्हण :- "बरंबर" ...
झोपायला खाट लाव..!"
पत्नी म्हणाली ः-
"मी खाट तोडून टाकली
व लाकडे जाळुन टाकली.
मेलं शुद्राचं काहीच नको
आपल्याला..!!"
ब्राम्हणाने डोक्याला हात लावला
म्हणाला :- "अरे...
ईथली धान्याची पोती
कुंठ आहेत..?''
पत्नीः-
"मी धान्य लोकांना वाटून टाकले कारण....
ते आपण कुणबी शुद्रां कडुन
घेतले होते.
नकोच ते आपल्याला ..!"
ब्राम्हणाला भाेवळ आली
व म्हणाला,
" माझे आई...
घरात काहीच दिसत नाही.
वस्तू कुठं गेल्या..?"
पत्नी म्हणाली :-
"नाथ...
घरातली प्रत्येक वस्तू कुण्यातरी
शुद्रांनेच बनवली आहे.
त्यामुळे...
मी त्या तोडुन मोडुन
जाळुन टाकल्या..!"
ब्राम्हण मोठयाने ओरडला
म्हणाला,
" अरे आपण
पार भिकारी झालो...
एवढे घरंच काय ते
उरले आता...!"
पत्नी म्हणाली,
" नाथ...
चिंता करू नका,
मी आपल्या आज्ञे पुढे नाही,
मी हे घर दान करून टाकले आहे.
कारण... हे घर त्या शुद्र गवंडी वडार व शुद्र मजुरांनी बांधले होते,
नकोच बाई आपल्याला शुद्राचे."
"नाथ....
चला आपण जंगलात जावू
कारण...
इथे सर्व शुद्र आहेत,
भिक्षा काय शुद्राला मागायची..?
नको नको..!"
ब्राम्हण चक्कर येवुन
खाली पडला,
"हे देवा...
मी तर पार शुद्रापेक्षा
अतिशुद्र आहे.
माझ्याकडे कांहीच नाही,
मीच खरा शुद्र आहे,
माझे पानही शुद्रा शिवाय
हालत नाही...
देवा...
खरे उच्च 'कुणबी' शेतकरी
सर्व अठरा पगडं जातीच महान
व वंदनीय आहेत, मी मात्र काहीच कामाचा नाही..!"
मग त्या ब्राम्हणाने संपुर्ण समाजाची खाली डोके टेकुन
माफी मागीतली
व पत्नीच्या चरणावर
लोटांगण घालुन
तीची...
कान उघडल्यामुळे
आभार मानले..!
लक्षात ठेवा
जगात कुणीही
'श्रेष्ठ' वा 'नीच' नाही, सर्व समान व एकमेकांस पुरक आहेत..
पुजेला मांडलेली खारीक आपल्या लहान मुलाने
उचलुन खाल्ली तर त्याच्या गालाफाडात वाजवणारा बहुजन, तीच खारीक खाऊन भटजीचं
पोरग गुटगुटीत होत आहे,
याचा आपण कधीच विचार करीत नाही.
शेतात राब-राब राबुन हाडाची काडं केलेल्या आपल्या पत्नीला ती खारीक खाऊ घालावी,
हा विचार पण करीत नाही.
पुजेची तीच खारीक, खोबर, काजु, बदाम भटजीला देऊन, दक्षिणा देऊन
त्याच्या पाया पडायचा.
ही खुप मोठी गुलामगिरी आहे.
हे बहुजनांना कधी समजलंच
नाही .
पण फुले, शाहु, आंबेडकरांनी सांगितलं कि ही गुलामगिरी तोडा.
अरे, छत्रपती शिवरायांनी एवढे गड-किल्ले बांधले-जिंकले.
पण एकाही गड-कोटाची
पुजा-सत्यनारायण
कधी घातले नाही,
कधी मुहुर्त - पंचांग पाहुन
लढाया केल्या नाहीत...
मग त्या छत्रपती शिवरायांचे मावळे तुम्ही हे अंधश्रद्धा-कर्मकांड करायचं बंद करा.
ही गुलामगिरी तोडा .
"भटमुक्त व्हा भयमुक्त व्हा".
कोणतही कार्य करताना बुद्ध, कबीर, रविदास, महात्मा बसवन्ना ,संत तुकाराम, जिजाऊ, शिवराय, संभाजीराजे, महत्मा फुले, सावित्रीमाई, बाबासाहेब आंबेडकर,
संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना हार घालुन आपले कार्य पार पाडा.
यासाठी तुम्हाला कोणत्याही ब्राम्हण भटजीची गरज नाही, दक्षीणेचीे गरज नाही...
आपण आता भटमुक्त आणि भयमुक्त झालो पाहिजे ...
तीच खारीक, खोबरे, बदाम, काजु आता आपल्या पत्नीला, मुलांना चारली पाहिजे.
दक्षीणा देण्यापेक्षा मुलांना कँम्प्युटर, पुस्तके दिली पाहिजे.
उच्चशिक्षणासाठी परदेशात पाठवले पाहिजे .
विज्ञानवादी झालो पाहिजे, शाहणे झालो पाहीजे निरोगी - आनंदी झालो पाहिजे...
पटलं तर चार मित्रांचेही डोळे उघड़ा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा