**असा मिळणार अधिग्रहित जमिनीचा पाचपट मोबदला **
जमीन अधिग्रहण क्षेत्रात वकिली करणारे श्री प्रदीप क्षीरसागर , उच्च न्यायालय, नागपुर (९८२२९३३३२८) यानि नविन अधिग्रहण कायद्यानुसार जमिन मालकाला पुढील प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल असे सांगितले
जर ग्रामीण भागातील एखाद्या जमीनी चा बाजार भाव उदारणार्थ १००००० असेल तर शासनाने गुणक २ जाहिर केल्या मुले १०००००×२=२००००० +तेवढेच म्हणजे १००% सांत्वना राशी म्हणजे २०००००+२०००००=४०००००
या सोबत २५% अतिरिक्त राशी म्हणजे ४०००००+१०००००=५००००० आणि आणखी जमिनीचा ताबा घेतल्याच्या दिवसापासून पैसे शेतकऱ्याना मिळे पर्यन्त १२% व्याजाची रक्कम असे असेल, ढोबळपणाने बाजार भावाच्या ५ पट नुकसान भरपाई मिळेल, शेतकरी /जमिन मालक यानि अधिग्रहण अधिकाऱ्या समोर बाजार भाव जास्त असल्याचे सिद्ध करुन लाभ मिळवता येइल, जास्तीत जास्त शेतकरी बान्धवा पर्यन्त पोहचवा, योग्य नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही.
१३/८/२०१४ ला महारास्ट्र शासनाने १.१० चे गुणक लावले होते त्या मुले १ लाख बाजारभाव असल्यास १.१० गुणक नुसार केवळ ११००००(एक लाख दहा हजार) आणि तेवढेच सांत्वना राशी म्हणजे एकून २२०००० एवढेच नुकसान भरपाई मिळत होती म्हणजे पाच लाख(५०००००) ऐवजी दोन लाख विस हजार (२२००००) नुकसान (१८००००) एक लाख ऐशी हजार, पण सदर १.१० गुणका मुळे चारपट मोबदला मिळत नसल्या चे कारणाने उच्च न्यायाल्याने रद्द केल्याने शासनाला नविन २ हे गुणक जाहिर करावे लागले
परन्तु १३/८/२०१४ ते २०/५/२०१५ या कालावधीत बरेच निवाडे पारित करताना १.१० हे गुणक लावुन नुकसान भरपाई रक्कम ठरविली होती असे शेतकरी सुद्धा २ चा गुणक लावून येणाऱ्या रकमेच्या व् आधी मिळालेल्या रकमेतील फरक रक्कम मिळण्यास पात्र असतील
माहिती महत्वाची आहे काही अधिकारी ही माहिती शेतकऱ्या कडून लपवतात सामाजिक जबाबदारी म्हणून तुम्ही मेंबर असलेल्या सर्व ग्रुप मधे पाठवा ,शेतकऱ्यासाठी एवढे तर नक्कीच करू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा