माफ कर दोस्ता !
खोटे नाही बोलणार 
बघ काळजाचा कप्पा 
उगीच आमच्यासाठी 
जिव दिलास हनूमंतअप्पा 
तू बाजी लावली प्राणाची 
मनी स्वार्थ नव्हता काही 
पण खरं सांगू का तुला 
आम्ही त्या लायकीचेच नाही 
मेणबत्त्या लावू 
अन श्रध्दांजली वाहू 
त्याच्या बातम्या आम्ही 
टि व्ही, पेपरात देउ 
जातीयवाद, भ्रष्टाचार 
ईत्यादी ईत्यादी 
लिहत बसलो तर 
खुप मोठी होईल यादी 
पण हे सारं ईत्यादी 
करीत राहू आम्ही 
अन आमच्यासाठी सिमेवर 
लढत रहा तुम्ही 
काल तर वाटलीच नाही 
मग कशी वाटणार आज ? 
खरंच सांगतो कशाचीही 
आम्हाला वाटत नाही लाज 
तुझ्या सारखे कितीतरी 
आमच्यासाठी मेले 
पण आमच्यात मात्र कोणतेही 
परिवर्तन नाही झाले 
उगीच आमच्यासाठी 
कुणीही नका मरू 
कारण आम्हाला जे वाटते 
तेच आम्ही करू 
शांती मिळो तुझ्या आत्म्याला 
आम्हीच भोगु आमचे पाप
खरं तेच बोललो दोस्ता 
करून टाक बाबा माफ
( ताजा कलम : शहिदांच्या मृत्यूचेही भांडवल करणा-या तमाम प्रसिद्धी पिसाटांसाठी आणि स्वतः च्या स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या 
निगरगट्ट पुढा-यांसाठी नाईलाजाने
हा तळतळाट व्यक्त झाला )
अॅड, अनंत खेळकर 
जठारपेठ, अकोला 
मोबाइल : 9370061677
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा