शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

विवाह प्रसंगी कन्येच्या पित्याने केलेले भाषण

"  माझ्या मुलीच्या नव्या कुटुंबाला काही सांगण्याचा माझा विचार आहे . पण तसे करणे अयोग्य ठरेल कारण आता तिचे लग्न झालेले आहे आणि ती तुमच्या कुटुंबातील सदस्य बनली आहे . माझ्यावर विश्वास ठेवा , त्याबद्दल माझी कुठलीही त़र्कार नाही . उलट आता माझ्या मुलीचे पहिले प्राधान्य हे तुमचे कुटुंब असले पाहिजे . आता तिच्या आयुष्यात आमची भूमिका मागच्या सीटवर बसून फक्त बघण्याची असेल . आम्ही हे सगळे आनंदाने स्वीकारले आहे . पण आमची एक विनंती आहे . तिला आनंदात ठेवा !

       "   मला खात्री आहे की , तुम्ही तिला आनंदात ठेवाल . कदाचित ती आमच्यापेक्षा तुमच्याकडे अधिक आनंदी राहील . पण प्रत्येक वडिला प्रमाणेच मला माझी मुलगी आनंदात राहावी असे वाटते . त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की , तिला आनंदात ठेवा .

          "  ती माझ्यासाठी कधीच ओझे नव्हती . उलट ती माझा श्वास आणि चेहऱ्यावरील हास्य आहे . मी तिचे लग्न करुन देत आहे ;  कारण ते सगळे निसर्गनियमानुसार करावेच लागते .  आपल्या संस्कृती समोर मी असहाय्य आहे आणि म्हणूनच तुमच्या घरी पाठवत आहे . ती माझ्या घरातील आनंद होती आणि आता तुमच्या घरी प्रकाश देईल , हा माझा तुम्हांला शब्द आहे . रक्त , घाम गाळून मी तिचे पालनपोषन केलेले आहे आणि आता ती परिपूर्ण बनली आहे . आता माझी मुलगी तुमच्या सगळ्यांची काळजी घेईल ,  सगळ्यावर  प्रँम करेल ,  मायेची ऊब देईल . त्या बदल्यात माझे एकच मागणे आहे - प्लीज तिला आनंदी ठेवा !

        " समजा , तुम्हाला कधी वाटले की , माझी मुलगी काही चुकीचे बोलली किंवा तिच्याकडून काही चूक झाली तर तिला रागवायला माझी काहीच हरकत नाही . पण तिच्याशी प्रँमाने वागा . कारण  ती खूप नाजूक आहे . जेव्हा तिला निराश वाटेल तेव्हा तिच्या बरोबर राहा .  तुमचे तिच्याकडे थोडेफार लक्ष असू द्या . त्याची तिला गरज आहे . ती कधी आजारी पडली तरी तिची काळजी घ्या . कोणती जबाबदारी पार पाडण्यास ती कमी पडली तर तिला खडसावून सांगा . पण तिच्याविषयी सहानुभूती बाळगा . ती अजून शिकते आहे . तिला समजावून घ्या . प्लीज तिला आनंदी ठेवा . 

          "  तिला अनेक महिने भेटता आले नाही , तरी मला काही वाटणार नाही . पण मी रोज एकदातरी तिच्याशी फोनवर बोलल्याशिवाय राहणार नाही . जर तिला माझी आठवण आली नाही , तर माझ्यासारख्या आनंदी मीच असेन . पण माझ्या जगण्याचा केवळ एकमेव उद्देश आहे आणि तो म्हणजे माझ्या मुलीचा आनंद .  तो तिला देत राहणे हे आता तुमच्या हाती आहे . मी तुमच्याकडे याचना करतो की , प्लीज तिला आनंदी ठेवा . जावईबापू , हे शब्द तुम्हांला आता फारसे महत्त्वाचे वाटणार नाहीत . पण जेव्हा कधी मुलीचे बाप व्हाल ,  तेव्हा या शब्दांचे मोल तुम्हांला कळेल . त्या वेळी तुमच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून आवाज येईल ,  प्लीज तिला आनंदात ठेवा .  "

             ---  सर्व वडिलांसाठी
                           समर्पित . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा