सोने चांदी शुद्ध करण्याचा व्यवसाय ज्याला ' आटनी, गलाई' या नावाने ओळखले जाते तो 18व्या दशकात मुंबई मध्ये इराणी लोक करत असत. गावाकडून दुष्काळ आणि नापिकी ला कंटाळुन अनेकजण मुंबई ला जात. हमाली करत. गोदीत काम करत. वेजेगावचे सखाराम गुरव, परशुराम गुरव हे बंधू बोरीबंदर , जव्हेरी बाजार परिसरात भाजी विकणे असे किरकोळ व्यवसाय करत. तिथेच एका इराणी गलाई बांधवाकडे ते दोघेजण रिफायनरीच काम शिकले... मजुरीने सोने refine करण्याचा आणि गाळायचा पायंडा देशात प्रथम त्यांनी पाडला. जव्हेरी बाजारातील सराफांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना लाभला. त्यासाठी जादा मजुरांची गरज भासू लागली. हा काळ होता 1882 चा...
माण, खटाव, खानापूर , आटपाडी , कवठे , तासगाव परिसरातील लोकांना गरजे नुसार गलाई व्यवसायात संधी मिळत गेली... आज देशात असे एकही मोठे शहर नसेल जिथे या भागातील गलाई वाला भेटणार नाही...
आज खानापूर आणि आसपास च्या तालुक्यात बाहेरचं कुणी आलं तर इथले बंगले , इमारती पाहून अवाक होतात. भले फरशी पुसायला पाणी नसेलही.... आज काही भागात टेम्भु चे पाणी आलं आहे. डाळिंब, द्राक्ष, ऊस पिके , बागा दिसत आहेत... प्रगती दिसते आहे. मिरज पूर्वी दवाखाण्यासाठी प्रसिद्ध होते. विटा शहरातही कॉलेज, दवाखाने झाले आहेत. इथल्या लोकांच लाईफ स्टाइल सुधारले आहे... पण आजही इथे गरिबीत होरपळणारा 'भारत' दिसतोच.... करोडो खर्चून बांधलेले बंगले दिसतात.ती फक्त आणि फक्त गलाईवाल्यांची पुण्याई आहे.....सलाम त्या भगिरथाना....
गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६
सोने चांदी शुद्ध करण्याचा व्यवसाय
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा