शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

सैनिक

आमचे जवान शहिद झाले की आम्हाला एक उमाळा येतो..
श्रध्दांजलीची लाट येते
15  आँगस्ट आणि 26 जानेवारी ला जसे  आमचे देश प्रेम उफाळून येते आणि दोन दिवसा नंतर त्याचा ज्वर आपोआप कमी होतो ...
तसे एखादा जवान शहिद झाला की सोशल मेडिया आहेच दुख व्यक्त करायला .... शहिद जवान अमर रहे
अशा घोषणा देतात ...
पण असे कितीसे शहिद जवान आपल्या लक्षात राहतात हो ...
गेल्या 60 वर्षात भारताने पाकीस्तानच्या एकतरफा युद्धा मुळे 60 हजार जवान गमावले  ....
कितींची आठवण आहे आपल्या सर्वांनाच ...त्यांच्या कुटूंबाचे काय झाले असेल कुणाचा एकुलता एक मुलगा
कुटूंबाचा एकमेव आधार , नविनच लग्न झालेला तरूण  ,  कुणाचा  भाऊ
असे किती तरी  कुटूंब उध्वस्त झाली असतील ...अशा शहिद झालेल्या जवांनाच्या कुटूंबाची नंतरची परिस्थिति काय असेल याचा मागमुस घेण्याचा प्रयत्न एखादा मेडीया किंवा आपण करत असतो का?
गेली 40 वर्ष माजीसैनिक  आपल्या निवृत्ति वेतनासाठी झटत आहेत
पण त्यांच्या मागण्यामान्य होत नाही
डॉक्टर, वकिल , शिक्षक आणि काय कुठल्याही सरकारी कर्मचार्यांच्या मागण्या चुटकीसरशी मान्य करणारे सरकार सैनिकांच्या मागण्या मान्य का करत नाही ?
कारण त्यांचे युनियन नसते सरकारी कर्मचार्यांन प्रमाणे.म्हणून का?
गेले वर्ष भर  माजी सैनिक दिल्लीच्या जंतरमंतर वर पेन्शन साठी आंदोलन करत आहे . प्रसार माध्यमांनी किती दखल घेतली ...किती जनता त्यांच्या न्याय मागण्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली ....जय जवान लिहून चालत नाही ....
ज्या देशात सैनिक आणि शेतकरी यांचा सन्मान केला जातो त्या देशाचे भविष्य उज्ज्वल असते . या महान खंडप्राय देशात रक्षक आणि पोशिंदा कष्टात असेल तर आमचे  भवितव्य अंधकारमय असणार आहे
फ्रांन्स मध्ये सैनिकांना सर्वात जास्त पेन्शन दिले जाते..  एकूण निवृत्ति वेळेच्या वेतनाच्या 70% भारतात ते फक्त 40 % आहे
तेव्हा आता वेळ आहे की सैनिकांचे वेतनमान प्रचंड प्रमाणात वाढवून निवृत्ति नंतर  त्यांचे योग्य पुनर्वसन करणे आणि त्यांचे निवृत्ति वेतन योग्य प्रमाणात वाढवण्याची....
प्रसार माध्यमांनी आणि जनतेने शासनावर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे ...नाही तर ज्या दिवशी  या देशाचा सैनिक युनियन बनवून वेतना साठी संपावर जाईल त्या दिवशी या देशाचे  काय होईल ही कल्पना न केलेलीच बरी....
जय हिंद जय जवान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा