दाह शमन करणारा दैवी वृक्ष : औदुंबर अर्थात उंबर ....
नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे ...
भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो, औदुंबर झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते ....
किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो ...
या वृक्षाचे काही अदभूत उपयोग पाहूया ...
१. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा . त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे . कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते . त्यात हे सरबत उत्तम आहे . दिवसातून तीनदा घ्यावे ....
२. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत आसेल तर सालीचा काढा द्यावा .
३. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटोल- सेव्लोन च्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते ..
४. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो ...
५. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी , रक्तप्रदर , श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्त्राव होईत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो ...
६. गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात .... सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे ...
७. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचा चिक बत्ताशासोबत देतात ...
७. भस्मक नावाचा एक व्याधी आहे ज्यात व्यक्ती सारखे काही न काही खात असते . पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही काही वेळाने परत भूक लागते . या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात ...
८. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा ...
९.काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात ...
१०. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे ...
११. सरते शेवटी एक गोष्ट सांगतो हिरण्यकश्यपूचे पोट फाडल्यावर भगवान नरसिंहाच्या बोटांचा दाह होऊ लागला .. तो कशानेच थांबेना . मग त्यांनी त्यांची बोटे उंबराच्या फळात रोवली आणि त्यांचा दाह क्षणात कमी झाला ...
भगवान दत्तगुरूंना देखील ज्याच्या शीतल छायेत साधनेचा मोह आवरला नाही अशा उंबराची अशी ही कहाणी सफळ संपूर्ण ....
|| श्री गुरुदेव दत्त ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा