रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 119 वी जयंती


माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 119 वी जयंती

माता रमाई सारखी नि:स्वार्थी माणसं स्वत: अंधारात राहतात. प्रसिध्दिच्या प्रकाशात त्यांच नाव फारच कमी झळकतं. पण त्यांचे सारे जीवन उदात्ततेने त्यागाचे भरलेले असते. रमाई म्हणजे एक आदर्श गृहिणी, कर्तव्यदक्ष पत्नी व प्रेमळ पत्नी. जगी रमाई सारखे कोण आहे तिचे जन्मताच आपल्यावरी ऋण आहे. असे ऋण आहे त्याला व्याजच नाही. त्या ऋणाविना रमाईच्या जीवनास साज नाही. रमाई सारखी डोळस, प्रेमळ माया नाही. रमाईनं सोसलेल्या यातनांना या जगात तोड नाही. अशा मातोश्रीचे नाव या जगात रमाई, रमाई एवढे या जगात कशालाच मोल नाही. स्वतःच्या त्यागानं रमाईनं असे घडविले डॉ. 'बाबासाहेब' या जगात दुसरा कोणीच नाही.

फुल फुलाव म्हणुन झाड राञं - दिवसं धडपडत असतं. पण लोकांना ते फुललेलं फुलच दिसतं. वर्षानुवर्ष झाडानं त्यासाठी केलेली धडपड माञ लोकांना दिसत नाही. तसच रमाई ने सुध्दा आपल्या जिवनात खुप कष्ट आणि खुप दुख:सहन केले. ते फक्त डाॅ. बाबासाहेबांसाठी..

रमाईचे मोठे पण तिच्या पति भक्तीत, पति निष्ठेत आणि पति सेवेत सामावले होते.
सीतेला पति श्रीरामाच्या ईच्छेसाठी जनमतिविरुध्द महानदिव्य करावे लागले.
साविञिला पति सत्यवानाच्या मृत्युविरुध्द चिकाटीने लढावे लागले.
तर साध्वी "रमाईला" संन्याशी होऊ घातलेल्या आपल्या पतिला कर्तव्यनिष्ठ बनविण्यासाठी तिला तितकेच कर्तव्यकठोर बनावे लागले.

रमाई म्हणजे कठोर कर्तव्यनिष्ठेचे मुर्तिमंत प्रतिक, तिच्या कर्तव्यकठोर निष्ठेतुनच भारत देशात भारतीय घटनेचे शिल्पकार तसेच कोहिनुर हि-या समान डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांन सारखा दैदिव्यमान सुर्य या जगास लाभला.

सैनिक दर्पण तर्फे रमाई भीमराव आंबेडकर यांना 119व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा